नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील स्वस्त धान्य दुकानात ऑक्टोंबर महिन्याचे धान्य देण्याच्या आग्रह धरुन कुरापत काढत पत्नीसह दुकानात आलेल्या एका मद्यपीने संतापाच्या भरात रेशन दुकानातील ई-स्पॉश मशिन फेकून देत तोड-फोड केली. गावातील ५६ क्रमांकाचे दुकान निलंबित करण्यात आल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ५७ क्रमांकाच्या दुकानात धान्य वाटप सुरु असतांना हा प्रकार घडला. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने या घटनेचा निषेध करीत मद्यपी विरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.