पुणे – रेड अलर्टमुळे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुण्यात १४ जुलै रोजी हवामान खात्याने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी चिंचवड मधील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, ग्रामीण भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. तो लवकरच घेतला जाईल असे जिल्हा परिषदेतर्फे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसापासून पुणे व परिसरात मुसधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिल्यामुळे आता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुलांना पावसाची सुट्टी मिळणार आहे.