इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, इराणमधल्या अणुप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या आण्विक सुरक्षेत घट झाली आहे, मात्र गळती होणाऱ्या क्ष-किरणांनी अजूनही धोकादायक पातळी ओलांडली नसल्याचं ग्रोसी यांनी सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत सांगितलं.
या अणु प्रदूषणाचा धोका झाल्यास काय परिणाम होईल आणि त्यातून तो कोणाला जास्त त्रासदायक असेल ही माहिती अजूनही समोर आली नाही.