मुंबई – एका महिलेला २४ आठवड्यांच्या गर्भपाताची करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. महिलेच्या गर्भात तीन भ्रूण वाढत आहेत. २४ आठड्यांच्या गर्भपाताची परवानगी देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. या गर्भामुळे महिलेची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे, असे मत जे. जे. रुग्णालयाचे एका तज्ज्ञांच्या पॅनलने व्यक्त केले होते. त्यामुळे गर्भापाताची परवानगी देण्याची शिफारस केली होती.
न्यायमूर्ती शाहरुख काठवाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. मानसिक समस्यांनी पीडित ४१ वर्षी महिला आणि तिच्या पतीने दाखल केलेली याचिका न्यायालयाने स्वीकारली होती. महिलेच्या गर्भात तीन भ्रूण आहेत. परंतु त्यांची व्यवस्थित वाढ होत नसल्याने गर्भपाताची परवानगी द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. महिलेच्या गर्भातील एका भ्रूणचे डोके नाही, तर दुस-या भ्रूणाची अनुवांशिक समस्या होत्या ज्यामुळे त्याचा जन्म होण्याची शक्यता कमीच होती. पैकी तिस-या भ्रूणाचा व्यवस्थित जन्म होण्याची शक्यता होती. भ्रूण वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पूर्णिमा सातोसकर यांनी रॉयल कॉलेज ऑफ ऑब्सटेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिस्टच्या दिशानिर्देशानुसार, संपूर्ण गर्भापाताचा सल्ला दिला. पुढे महिलेला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पॅनलने म्हटले आहे.