नवी दिल्ली – केंद्र सरकार कोविड -19 च्या उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या प्रत्येक औषधाच्या पुरवठ्यावर देखरेख ठेवत असल्याचे केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज सांगितले. कोविड 19 व्यवस्थापनात वापरली जाणारी सर्व औषधे याचं उत्पादन आणि आयात वाढवल्यामुळे आता भारतात उपलब्ध आहेत. पुरवठा साखळी व्यवस्थापन, मागणी व्यवस्थापन आणि किफायतशीर हे त्रिसूत्री धोरण राबवून या औषधांच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवले जात आहे.
प्रोटोकॉल औषधे :
1.रेमडेसिव्हिर
2.एनॉक्सॅपरिन
3.मिथाईलप्रेडनिसोलोन
4.डेक्सामेथासोन
5.टोसिलीझुमब
6. इव्हर्मेक्टिन
प्रोटोकॉल नसलेली औषधे:
7.फेवीपीरावीर
8.अँफोटेरिसिन
9.अपिक्सामब
सीडीएससीओ आणि एनपीपीए मे, 2021 साठी उत्पादन वाढवण्यासाठी आणि सध्याचा साठा, सद्य क्षमता, अंदाजे उत्पादन यासंबंधित माहिती मिळवण्यासाठी उत्पादकांशी समन्वय साधत आहेत
1.रेमडेसिवीर :
रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संख्या 20 वरून 60 पर्यंत वाढल्यामुळे केवळ 25 दिवसात त्याची उपलब्धता 3 पटीने वाढली आहे.
एप्रिल 21 मध्ये उत्पादन 10 लाख कुप्या होते ते 10 पटीने वाढून मे महिन्यात 1 कोटीवर गेले
2.टोसिलीझुमॅब इंजेक्शनः
सामान्य काळापेक्षा 20 पटीने अधिक आयात करुन ते देशात उपलब्ध करुन देण्यात आले आहे .
3.डेक्सामेथासोन 0.5 मिलीग्राम गोळ्या:
महिन्याभरात उत्पादन 6-8 पटीने वाढले
4. डेक्सामेथासोन इंजेक्शन – उत्पादन जवळपास 2 पटीने वाढले.
5.एनॉक्सापेरिन इंजेक्शन – उत्पादन केवळ एका महिन्यात 4 पटीने वाढले.
6.मिथाइल प्रेडनिसोलोन इंजेक्शन – महिन्याभरात उत्पादन जवळपास 3 पटीने वाढले.
7.इव्हर्मेक्टिन 12 मिलीग्राम टॅब – उत्पादन एप्रिलमधील 150 लाखांवरून 5 पटीने वाढून मे 2021 मध्ये 770 लाखांवर गेले
8.फावीपिरावीर : हे प्रोटोकॉल नसलेले औषध आहे, मात्र विषाणूचा भार करण्यासाठी वापरले जाते.
एका महिन्यात उत्पादन 4 पटीने वाढले. एप्रिल,21 मध्ये 326.5 लाखांवरून मे 21 मध्ये ते 1644 लाख झाले .
9.अँफोटेरेसिन बी इंजेक्शन: एका महिन्यात उत्पादन 3 पटीने वाढले. लाख कुपीचे उत्पादन सुरु आहे आणि
3 लाख कुपी आयात केल्या जात आहेत देशात एकूण 6.80 लाख कुपी उपलब्ध असतील.