अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात भक्ष्याच्या शोधत रास्ता ओलांडून जात असताना बिबट्याचा अपघात झाला आहे. या अपघातात बिबट्या कार खाली अडकून जखमी झाला. कारणे धडक दिल्यामुळे बिबट्या कारखाली काही अडकल्याने त्याला पाळताही येत नव्हते. कार चालकाने गाडी हळू हळू मागे घेतल्याने बिबट्याची सुटका झाली आणि त्याने पुन्हा जंगलाकडे धूम ठोकली.