अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात जोरदार बरसलेल्या पावसाने नद्या ,नाले तुडुंब भरून वाहत असून ओझरखेड – वरखेडा गावांना जोडणारा पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दोन्ही गावांसह इतर ५ ते ७ खेड्यांचा संपर्कही तुटला आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल नेण्यास अडचण होत आहे. तर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना ५ ते ६ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. तर अनेक विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी या पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन ये- जा करीत असून शासनाने तातडीने हा पूल दुरुस्त करून द्यावा अशी मागणी होत आहे.