येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – औरंगाबाद महामार्गावर अचानक एका बाईकला आग लागली.. येवला येथील कोटमगाव शिवारात ही घटना घडली. येवल्याहून वैजापूरकडे दुपारच्या सुमारास मोटरसायकलस्वार आपल्या मुलाला सोबत घेऊन जात असतांना मुलाला तहान लागल्याने पाणी देण्यासाठी गाडी माेटारस्वाराने थांबवली. त्यावेळेस मुलाला घेऊन उतरत असतांना अचानक गाडीने पेट घेतला. त्यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात बाप-बेटे दोघे थोडक्यात बचावले.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641319828136034304?s=20