शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ठाण्यातील तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण; वाहतूक कोंडी दूर होणार

नोव्हेंबर 13, 2022 | 8:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Fhc2J8lVsAIXm8g

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केला.

कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या एका मार्गिकेचे रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, गोपाळ लांडगे, सुधीर कोकाटे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठामपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, शहर अभियंता प्रशांत सोनग्रा आदी उपस्थित होते.

आयुक्त श्री. बांगर यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि तिसऱ्या कळवा खाडी पुलाबद्दल सादरीकरण केले. तसेच, उर्वरित कामांच्या प्रगतीची माहिती दिली.
तिसऱ्या खाडी पुलाचे लोकार्पण झाल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले. तसेच, पुढील मार्गिका देखील लवकरच सुरू करण्याची घोषणाही केली. तसचे, या पुलाचा विस्तार पटनीपर्यंत करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही स्पष्ट केले. तीन हात नाका, माजीवडा जंक्शन येथेही लवकरच काम सुरू होईल, असे मुख्यमंत्री महोदय म्हणाले.
लोकार्पण सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलावरून प्रवास केला आणि ही मार्गिका तत्काळ लोकांसाठी खुली करण्यात आली.

कळवा खाडी पुलाविषयी माहिती
– ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून ठाणे- बेलापूर मार्गे नवी मुंबईकडे जाण्यासाठी कळवा खाडीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे.
– या पूलाचे 93% काम पूर्ण झाले आहे. परंतु, या परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या पूलाच्या पोलीस कमिशनर ऑफिस ते कळवा चौक- बेलापूर रोड ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्यात येत आहे.

– कळवा खाडीवर एकूण तीन पूल आहेत. पहिला पूल ब्रिटिशकालीन असून तो 1863 मध्ये बांधला होता. 2010मध्ये त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली. ऑगस्ट 2016 मध्ये हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला. तो आता वास्तू वारसा (हेरिटेज साईट) आहे.
– १९९५-९६ दरम्यान दुसरा कळवा खाडी पूल बांधण्यात आला. त्यावरूनच आतापर्यंत सर्व वाहतूक सुरू होती. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दोन्हीकडील चौकात वाहतूक कोंडी होत होती. म्हणून हा तिसरा पूल बांधण्यात आला आहे.

– तिसरा पूल २०१३ मध्ये प्रस्तावित करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या महासभेने 20 फेब्रुवारी 2014 रोजी त्यास मान्यता दिली. (ठराव क्रमांक -462). लगेच कार्यादेश देऊन काम सुरू करण्यात आले.
– नवीन पूलाची एकूण लांबी 2.20 कि.मी. असून पूलाकरिता एकूण 5 मार्गिका बांधण्यात आलेल्या आहेत.
– या पूलाचा एकूण प्रकल्प खर्च 183.66 कोटी इतका आहे.

– ठाणे कारागृहाजवळील मार्गिका डिसेंबर महिन्यामध्ये वाहतूकीस खुली करण्यात तयार होईल.
– उर्वरित साकेत कडील मार्गिका माहे मार्च 2023 पर्यंत वाहतूकीस पूर्ण तयार होऊन संपूर्ण पूल वाहतूकीस उपलब्ध होईल.

– संपूर्ण पूल माहे मार्च 2023 मध्ये वाहतूकीस उपलब्ध झाल्यानंतर कळवा, मुंब्रा आणि बेलापूर कडे जाणारी संपूर्ण वाहतूक पूलावरुन एकेरी मार्गाने जाईल आणि बेलापूर रोड कळवा, मुंब्रा कडून ठाणे शहराकडे येणारी वाहतूक पूर्णपणे सध्या वापरात असलेल्या पूलावरुन एकेरी मार्गाने असेल.
– सदरचा पूल पूर्ण क्षमतेने माहे मार्च 2023 मध्ये वाहतूकीस उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची संपूर्ण समस्या दूर होणार आहे.

– पूलावर येण्यासाठी पोलीस कमिशनर ऑफिस मार्गिका, जेल जवळील मार्गिका आणि साकेत कडून येणाऱ्या वाहनांकरिता वर्तुळाकार मार्गिका अशा तीन मार्गिका आहेत.
– पूलावरुन उतरण्यासाठी कळवा चौक आणि बेलापूर रोड अशा दोन मार्गिका आहेत.
– पूलावर ठाणे आणि कळवा दरम्यान शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पादचारी मार्गिकेची सुध्दा व्यवस्था असणार आहे.

– खाडीवरील पूलाची लांबी 300 मी.मी. असून त्यापैकी 100 मी. लांबीचा बास्केट हॅण्डल आकाराचा लोखंडी नेव्हीगेशन स्पॅन आहे. त्याला स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर ही अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे स्पॅनच्या संरचनेच्या स्थितीबाबत दररोज मूल्यमापन होऊ शकेल.
– सदर नेव्हीगेशन स्पॅनला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून यामुळे पुलाच्या तसेच एकूणच शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1591800546117423105?s=20&t=ksN0Jn2v-eGcebrG8X0tRg

Thane Traffic Jam CM Eknath Shinde
Flyover Roads Highway

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशकात प्राईम लोकेशनवर घर हवंय? मग, तुमच्यासाठी हा आहे सर्वोत्तम पर्याय (ADVT)

Next Post

मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण; प्रत्येक फेरीला होणार सुमारे ३० मिनिटांची बचत

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Fhc2KsMVEAES8J6

मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण; प्रत्येक फेरीला होणार सुमारे ३० मिनिटांची बचत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011