शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थ्यावर अतिप्रसंग… ठाण्यातील धक्कादायक प्रकार…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 22, 2023 | 12:09 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण हे पवित्र कार्य मानले जाते. ज्ञानदानाच्या या कार्यात शिक्षकांना गुरुवर्य म्हटले जाते. लहान मुले घडविण्यात तर शिक्षकांचा मोठा वाटा असतो. परंतु अलीकडच्या काळात काही शाळांमध्ये शिक्षकांकडूनच गैरप्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई, पुणे या शहरांमध्ये बालवर्गातील मुलांना शिक्षकांकडून मारहाण झाल्याचे प्रकार घडले होते. आता ठाणे जिल्ह्यात कल्याणमध्ये एका विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकांनी अगदी ५ वर्षे वयाच्या बालकावर अतिप्रसंग केल्याने सर्वांनाच धक्का बसला असून या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण येथील पूर्व भागातील एका इंग्रजी शाळेतील शिक्षकाने शाळेच्या स्वच्छतागृहात असा अतिप्रसंग करण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पालकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून या आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

नृत्य शिकवणारा
कल्याण शहरातील पूर्व भाग हा गजबजलेल्या वस्तीचा या ठिकाणी अनेक शाळा आहेत. त्यात इंग्रजी शाळांचा देखील समावेश होतो त्यातच एका इंग्रजी शाळेत हा पीडित विद्यार्थी शिक्षण घेतो. शाळेतील स्वच्छतागृहात गेल्यावर समीर कदम नावाच्या विकृत मनोवृतीच्या या शिक्षकाने त्याच्यावर तेथे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने भयभीत झालेल्या मुलाने रडत रडतच घरी पळ काढला, त्यानंतर त्याने पालकांना शाळेत घडला गैरप्रकार सांगितला. कदम हा शाळेत नृत्यशिक्षक असून त्याच्याबद्दल अनेक तक्रारी आता आले आहेत.

पालक शाळेत पोहचले
दरम्यान, ही वाईट घटना घडल्यानंतर शाळेला दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी पीडित मुलाचे पालक शाळेत पोहचले. त्यांनी व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांना घडला प्रकार सांगितला. सुरुवातीला त्यांना हे खरेच वाटेना मात्र अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. व्यवस्थापनाने या शिक्षकाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपी शिक्षकाला अटक केली. या शिक्षका विरुध्द पॅाक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा गैरप्रकार उघड झाला मात्र अशा अनेक घटना शाळांमध्येच नव्हे तर कानाकोपऱ्यात आणि रस्त्यावरही घडतात विशेषतः महिलांच्या बाबतीत अशा प्रकार घडत असल्याने कल्याण शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Thane Crime School Teacher Student Sexual Harassment
Dance Minor Posco

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवर कारवाईची चिन्हे… हे आहे प्रकरण…

Next Post

नाशिकच्या रिलायन्स प्रकल्पाचे एबीबी कंपनीला मिळाले हे मोठे कंत्राट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नाशिकच्या रिलायन्स प्रकल्पाचे एबीबी कंपनीला मिळाले हे मोठे कंत्राट

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मतभेदांचे प्रसंग टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0420 1

अपघातग्रस्त शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले शालेय शिक्षण मंत्री

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0425 2

महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित, एकाचा शोध सुरू. उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0395 1

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 8, 2025
INDIA GOVERMENT

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकार सक्रिय…केल्या या उपाययोजना

ऑगस्ट 8, 2025
ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011