ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रक्षाबंधनानिमित्त बहिणीकडे जाऊ न दिल्यामुळे एका महिलेने स्व:चे आयुष्य संपविले आहे. पतीने बहिणीकडे जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून या महिलेने एक वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.
रक्षबंधनाचा सण नुकताच झाला. आपल्याकडे राखी पौर्णिमेपासून पाच दिवस रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो. दरम्यान एका महिलेने सणानिमित्त बहिणीकडे जाण्याची इच्छा नवऱ्याजवळ व्यक्त केली. मात्र, नवऱ्याने जाण्यास मनाई केली. या शुल्लकशा कारणावरून स्वत:च्या चिमुकलीसह आत्महत्या करण्याचा धाडसी निर्णय महिलेने घेतला. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका मोहिते असे या महिलेचे नाव आहे. तर धुर्वी असे मुलीचे नाव आहे. प्रियांकाला रक्षाबंधनासाठी सातारा येथील बहिणीकडे जायचे होते. परंतु, पतीने नकार दिला. यावरून दोघांचे भांडण झाले. बहिणीकडे जाऊ न दिल्याचा राग आल्यामुळे महिलेने सहाव्या मजलावरील अपार्टंमेटच्या बाल्कनीतून खाली उडी मारली. पती आणि शेजारच्यांनी तिला आणि मुलीला नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.
पतीने केला समजाविण्याचा प्रयत्न
प्रियांका मोहितेला बहिणीकडे जायचे होते. प्रियांकाची बहीण साताऱ्यात राहते. तिला तिच्याकडे जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा होता. परंतु, पतीने तिला जाऊ दिले नाही. मुलगी एका वर्षाची आहे. तिला घेऊन इतक्या लांबचा प्रवास करू नको, असे त्याने सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. याचा राग मनात धरत तिने सहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रियांकाच्या पतीचा जबाब नोंदवला आहे. घरातील इतर सदस्यांचा देखील जबाब नोंदवण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Thane Crime Married Women Suicide with Daughter