शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

थंडी, पाऊस, गारपीट व पुन्हा थंडी अशा समिश्र वातावरणाचा आठवडा…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

by Gautam Sancheti
डिसेंबर 24, 2024 | 12:29 am
in संमिश्र वार्ता
0
thandi

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- थंडी – आज मुंबई,कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात बोचऱ्या वाऱ्यासहित माफक प्रमाणात थंडीची शक्यता ही कायम आहे.
२- ऊबदारपणा – बुधवार आणि गुरुवार दि. २५-२६ डिसेंबरला ढगाळ वातावरणासहित किंचितशीच थंडी कमी होऊन संपूर्ण महाराष्ट्रात उबदारपणा जाणवेल.
३-पाऊस– गुरुवार ते शनिवार २६ ते २८ डिसेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार धुळे जळगांव मालेगाव नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छ.सं.नगर अकोला अमरावती नागपूर वाशिम शेगाव नगर पुणे नागपूर गोंदिया चंद्रपूर नांदेड परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते.

४- गारपीट – सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवार २७ डिसेंबरला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण २५ जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार धुळे जळगांव नाशिक छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात व लगतच्या परिसरात गारपीटीची शक्यता अधिक जाणवते.

५-गारपीटीची शक्यता कश्यामुळे वाढली? सध्याच्या २६ डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेयला दीड ते दोन किमी. उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची व ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैरुक्त दिशेकडून तर बं. उपसागरातून पूर्वे दिशेकडून आलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांची अश्या तीन वाऱ्यांच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन घडून येते-न -तेच घनीभवन होवून म्हणजेच डायरेक्ट द्रविकरणाची स्टेज लगेचच ओलांडून घनीभवन होवून गारपीट होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

६-पुन्हा थंडी- मात्र वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार ३० डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करू या!
माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचे कौटुंबिक कलह मिटतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ डिसेंबरचे राशिभविष्य

Next Post

बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून महिलेने सोन्याचे दागिने व रोकड केली लंपास, गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून महिलेने सोन्याचे दागिने व रोकड केली लंपास, गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011