माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- येत्या पाच दिवसा (१९ ते २४ डिसेंबर) मधील माफक थंडी व तापमाने आज पासून पुढील पाच म्हणजे मंगळवार २४ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरून खालीलप्रमाणे भागपरत्वे तापमाने राहून माफक थंडीची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकण – किमान १५ ते २० तर कमाल ३१ ते ३४ डिग्री से. ग्रेड, खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे ७ ते १४ तर कमाल तापमान २६ ते ३१ डिग्री से. ग्रेड मराठवाडा – किमान तापमान हे ९ ते ११ तर कमाल तापमान २९ ते ३० डिग्री से. ग्रेड विदर्भ -किमान तापमान हे ९ ते १३ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से. ग्रेड
२- त्यानंतरच्या पुढील पाच (२५ ते २९ डिसेंबर) तापमानात अजून वाढ होवून ऊबदारपणा जाणवेल. त्या दिवसातील तापमाने – मुंबईसह कोकण – किमान १७ ते २० तर कमाल ३२ ते ३४ डिग्री से. ग्रेड, खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे ९ ते १५ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे १० ते १२ तर कमाल तापमान ३० ते ३२ डिग्री से. ग्रेड विदर्भ -किमान तापमान हे ११ ते १५ तर कमाल तापमान ३० ते ३३ डिग्री से. ग्रे त्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी यावर्षी जाणवणार नाही, असे वाटते.
३-पुन्हा वर्षअखेर व नववर्षातील ३० डिसेंबर पासून थंडीत वाढ होण्याची शक्यता असुन तापमाने खालीलप्रमाणे असतील. मुंबईसह कोकण – किमान १२ ते १७ तर कमाल २६ ते ३० डिग्री से. ग्रेड, खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे ५ ते १२ तर कमाल तापमान २६ ते ३१ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे ८ ते ११ तर कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड विदर्भ -किमान तापमान हे ८ ते १२ तर कमाल तापमान २७ ते ३० डिग्री से. ग्रे वर्षाअखेरीस म्हणजे रविवार दि. २९ डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करू या!
४-येत्या नजीकच्या काळात कोणत्याही वातावरणीय घडामोडीतून महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.
५-दरम्यानच्या कालावधीत, महाराष्ट्रात वातावरणात काही बदल किंवा वातावरणीय घडामोड झाल्यास, अवगत केले जाईल.
माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)
IMD Pune