माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- वायव्य भारतात समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत मध्यप्रदेशातील विदिशाच्या आसपास केंद्रबिंदू स्थित, घड्याळकाटा दिशेनचे प्रत्यावर्ती (घुसळल्यासारखे) बाहेर फेकणारे चक्रीय थंड वाऱ्यामुळे उत्तर भारतातील थंडी महाराष्ट्रात पूर्व दिशेने फेकली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट तर काही ठिकाणी थंडीच्या लाट सदृश्य स्थिती जाणवत आहे.
२- सकाळी साडे आठच्या निरीक्षणावरून महाराष्ट्रात थंडीची लाट किंवा थंडीच्या लाट सदृश्य स्थिती जाणवणाऱ्या ठिकाणांचे आजचे किमान तापमान डिग्री सेन्टीग्रेड मध्ये खालील प्रमाणे आहे.( कंसातील अंक सरासरीपेक्षा झालेली घसरण दाखवते. अहिल्यानगर ५. ५(-५.६), परभणी ८. ३(-५.६), , नागपूर ९. ४(-५), मुंबई सांताक्रूझ १४ (-४.५), सोलापूर ११.५(-४.५), धाराशिव९.४(-४.४), चंद्रपूर १०.⅘(-३.६), अकोला ९.९(-३.८), डहाणू १५(-३.६), नाशिक ९.४ (-२.९), पुणे ७.८(-४.३), सं. नगर ९. ६(-३.१), अमरावती १०. ६(-३.६), बुलढाणा ११. ४(-३. ३), चंद्रपूर १०.४(-३. ६), वर्धा ९. ४(-४. १),
३-सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता ही कायम आहेच.
माणिकराव खुळे.
Meteorologist (Retd)
IMD Pune