गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्याला भरली हुडहु़डी, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरू; नगर-नाशिकमध्ये जास्त थंडी

नोव्हेंबर 21, 2024 | 11:42 pm
in संमिश्र वार्ता
0
thandi

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आणि सीमेपलीकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्राकडून शीतलहरींचा प्रवाह मागील काही दिवसांमध्ये वाढल्यामुळे हा प्रवाह आता महाराष्ट्रापर्यंत परिणाम दाखवताना दिसत आहे. दक्षिण भारतही हा शीतलहरींनी प्रभावित होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांचा झोत वेगाने राज्यात येत असल्यामुळे नाशिक, विदर्भात तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. कोकणही अपवाद ठरत नाही.

सध्याच्या घडीला राज्यात थंडीला पोषक हवामान असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा शेवट थंडीनेच होणार असल्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये तापमान १२.४ अंशांवर आले आहे, तर जळगावात १३.२ अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये १३.२ अंश, साताऱ्यात १४.५ अंश, कोल्हापुरात १७.२ अंश इतके तापमान आहे. विदर्भातही हीच स्थिती असून, नागपुरात पारा १३.६ अंश, गडचिरोली येथे १४ अंश सेल्सिअसवर आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार हिमालय क्षेत्रासह उत्तर भारतात पश्चिमी झंझावात अर्थात एक तीव्र थंड हवेचा झोत सक्रीय असल्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. उत्तर भारतीय राज्यांमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीचे प्रमाण येत्या दिवसात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्येही वातावरणात बदल झाले असून, किमान आणि कमाल तापमानाच घट होताना दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून आणि येत्या काही दिवसांमध्येही देशासह राज्यात थंडीसाठी पूरक वातावरण राहणार असून, महाराष्ट्रात शीतलहरींमध्ये अडथळे आणणारे कोणतेही घटक सक्रिय नसल्यामुळे गुलाबी थंडी बोचऱ्या थंडीचे रुप धारण करू शकते. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळे पंजाब, हरयाणा आणि राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्च दाब क्षेत्रामुळे ईशान्यकडून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

पुणे, नाशिक, नागपूरमध्येच नव्हे, तर आता मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असे असले, तरीही मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटेच्या वेळी गारवा आणि दुपारी उष्मा अशा विचित्र हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. पुढील ४८ तासांनंतर थंडीचे हे प्रमाण शहरासह राज्याच्या बहुतांश भागात आणखी वाढेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव खासगी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार

Next Post

अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
ajit pawar11

अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011