माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…..
१-पावसाची सांगता ऑक्टोबरअखेर जाणवते. आणि अजुनही ‘ ला- निना ‘ दृष्टिपथात नाही. त्यामुळे लगेचच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता जाणवते. येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, सं. नगर जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात मात्र या आठवड्यात लगेच थंडी जाणवणार नाही.
२- एक नोव्हेंबर नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीत वाढ होवु शकते.
३-जोपर्यंत ‘ ला- निना ‘ अवतरत नाही तोपर्यंत ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये थंडीची ही स्थिती कायमच टिकून राहू शकते, असे वाटते. ‘ ला- निना ‘ च्या हजेरीनंतर होणाऱ्या वातावरणीय बदलानुसार थंडीचे चढ-उतार, त्या-त्या वेळी नक्कीच स्पष्ट करता येईल.
४-सध्या काही ठिकाणी होतं असलेला पाऊस शेतकामासाठी काहीसा अडचणींचा ठरत असला तरी आता हा पाऊस चांगल्या स्वरूपाचा असुन रब्बीची हंगामाची शेतजमीन बैठक तयार करण्यास मदत करणारा आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.