इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – थायलंडच्या ईशान्य प्रांतात झालेल्या बेछूट गोळीबारात तब्बल ३४ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये २३ मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्ण तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. वृत्तानुसार, मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आणखी लोकांचा मृत्यू होऊ शकते. घटनेची अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या व्यक्तीने गोळीबार केला तो माजी पोलिस आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.
लहान मुलांवरही चाकूने हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये बहुतांश मुले आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, हल्लेखोर बँकॉक सारखीच नंबर प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टोयोटा गाडीतून आला होता. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की मृतांमध्ये २३ मुलांचा समावेश आहे. थायलंडमध्ये २०२० च्या सुरुवातीला एका सैनिकाने नाखोन रत्चासिमा सिटीमध्ये २१ लोकांना गोळ्यांनी लक्ष्य केले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोराने पत्नी आणि मुलालाही गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या घटनेची दखल घेत पंतप्रधानांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर नोंग बुआ लानफू प्रांतात लष्कराला सतर्क करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.
https://twitter.com/ChaudharyParvez/status/1577932443142696960?s=20&t=1boJyqCuyqjwyHQpCTzmiA
Thailand Mass Shooting 34 Death 23 Small Children’s