इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या पाचव्या व अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ही पाच सामन्याची मालिका २-२ बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंडसमोर ३७४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण, भारतीय संघाने ८५.१ ओव्हरमध्ये ३६७ धावांवर गुंडाळत इंग्लंडला पराभूत केले.
मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने केलेल्या बॅालिंगमुळे भारतीय संघाने हा सनसनाटी विजय मिळवला. सिराजने सर्वाधिक ५ विकेटस घेतल्या. तर प्रसिधने इंग्लडच्या ४ फलंदाजांना मैदानाबाहेर रस्ता दाखवत सिराजला अप्रतिम साथ दिली. तर आकाश दीप याने १ विकेट घेत दोघांना मदत केली.
या अंतिम सामन्यात पहिल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत भारताला फलंदाजी दिली. भारताने करुण नायर याच्या अर्धशतकाच्या जोरावर २२४ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने २४७ धावा करत २३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल याचं शतक तर आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे इंग्लंडला ३७४ धावांचं आव्हान मिळाले. ते भारतीय संघाने ८५.१ ओव्हरमध्ये ३६७ धावांवर गुंडाळत इंग्लंडला पराभूत केले.
या विजयानंतर WTC point table मध्ये भारतीय संघ तिस-या स्थानावर गेला आहे.