इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेने ठार केलेल्या अल कायदाचा सर्वात भयंकर दहशतवादी ओसामा बिन लादेनविषयी त्याच्या मुलाने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. लादेनचा मुलगा ओमर बिन लादेनने म्हटले आहे की त्याचे वडील त्याला प्रशिक्षण देत होते. आपल्या मुलाने आपल्याच मार्गावर पाऊल ठेवावे अशी त्याची इच्छा होती.
ओमरने कतार भेटीदरम्यान ‘द सन’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली असून त्यात त्याने अनेक खुलासे केले आहेत. वडिलांसोबतचा वाईट काळ विसरण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितलं आहे. व्यवसायानं चित्रकार असलेला ४१ वर्षीय ओमर आता पत्नी जैनासोबत फ्रान्समध्ये राहतो. लादेनचा मुलगा ओमरनं सांगितलं की, “मी लहान असताना त्यांनी मला अफगाणिस्तानात बंदूक चालवायला लावली आणि माझ्यासमोर कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांची चाचणी केली होती.” ओमरने दिलेल्या माहितीनुसार बिन लादेननं त्याचं काम सुरू ठेवण्यासाठी त्याची निवड केली होती. परंतु न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबर ११च्या दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी एप्रिल २००१ मध्येच उमरनं अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.
ओमरची ६७ वर्षीय पत्नी झैना यांनीदेखील भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की ओमरनं आजपर्यंत खूप त्रास सहन केला आहे. खूप वाईट तणाव, दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. तो एकाच वेळी ओसामावर प्रेम आणि द्वेषही करतो. तो त्याच्यावर प्रेम करतो कारण तो त्याचा पिता होता. पण लादेननं केलेल्या कृत्याबद्दल तो त्याच्या वडिलांचा खूप तिरस्कार करत, असंही झैना सांगतात.
Terrorist Osama Bin Laden Son Shocking Information