इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील शिवामोगा येथील मंजूनाथ यांचा मृत्यू झाला. मंजूनाथ यांच्या पत्नी पल्लवी यांनी या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला आहे. तसेच या हल्ल्यापूर्वीचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात राहणारे मंजुनाथ हे त्यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलासोबत जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. ते पहलगाम फिरत असताना हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात मंजुनाथ यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. पल्लवी यांनी या हल्ल्याचा अनुभव सांगितला आहे.
त्या म्हणाल्या की हे दहशतवादी केवळ हिंदू लोकांना लक्ष्य करून गोळ्या घालत होते. त्यांनी माझ्या नवऱ्याला मारल्यानंतर मी आणि माझ्या मुलाने दहशतवाद्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं आहे, आता आम्हालाही मारा. त्यावर एका दहशतवाद्याने मला सांगितलं की मी तुम्हाला मारणार नाही, जा आणि मोदींना हे सगळं सांगा. या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी आम्हाला मदत केली. तिथल्या तीन स्थानिक लोकांनी आमचे प्राण वाचवले, असे पल्लवीने सांगितले.
या हल्ल्याच्या आदल्या दिवशीच्या मंजुनाथ आणि त्यांच्या पत्नीचा शिकारा राईडचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. बघा हा व्हिडिओ