नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाला काही दिवस असतानाच जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी भारतील लष्कराच्या छावणीवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या गोळीबार करण्यात आला. ही चकमक बराच वेळी सुरू होती.
राजौरी येथील लष्कराच्या छावणीत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उरी हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर नाकाबंदी सैन्य दलावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. यानंतर झालेल्या प्रतिहल्ल्यात सैन्यात दोघाही अतिरेक्यांचा कंठस्नान घातले. जम्मू काश्मीर येथील राजौरीमध्ये ही घटना घडली. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय सैन्याचे तीन जवान शहीद झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर लष्काराने केलेल्या प्रत्तुत्तरात दोघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
सध्या या ठिकाणी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे परगल येथील लष्करी छावणीत किती दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते याबाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नसून, या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या कारवाईदरम्यान, भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत.
राजौरीतील दारहाल भागातील परगलमध्ये लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न कोणीतरी केला. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. तर, लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, दारहाल पोलिस स्टेशनपासून 6 किमी अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात 2 दहशतवादी ठार झाले असून तीन लष्करी जवान शहीद झाले आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असून आहे.
https://twitter.com/AdityaRajKaul/status/1557584571520016384?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवून सोडण्यासाठी कोणतीही मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना सातत्याने करत असतात. गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दले दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना ठामपणे हाणून पाडत आहेत. राजौरी येथे आज करण्यात आलेल्या या घटनेनंतर उरीतील दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयात घुसून दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता.
यात दहशतवाद्यांनी झोपलेल्या जवानांवर गोळीबार करत 17 हँडग्रेनेडचा वापर केला होता. यामध्ये लष्कराचे 16 जवान शहीद झाले होते. सुमारे सहा तास चाललेल्या या चकमकीत भारतीय लष्कराने चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. 20 वर्षांतील भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला होता. दहा दिवसांनंतर, 28 ते 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने संपूर्ण नियोजनासह पीओकेमध्ये तीन किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते.
राजौरीपासून नजिक असलेल्या एका सैन्य दलाच्या ऑपरेटिंग बेसवर आत्मघातकी हल्ला अतिरेक्यानी केला. या हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण आलं असून आता सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच चेकपोस्ट कसून तपास केला राजौरीच्या दाराहाल भागातील परगलमध्ये सैन्याच्या कॅम्प फेसला पार करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान गोळीबारही झाला. दारहल ठाण्याच्या सहा किलोमीटर दूरवर आता अतिरीक्त फौज पाठवण्यात आली आहे.
https://twitter.com/FrontalForce/status/1557636809990995969?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
खरे म्हणजे सैन्याच्या कॅम्पमध्ये घुसून अतिरेक्यांना हल्ला करायचा होता. पण आत्मघातकी हल्ल्याचा कट सैन्याच्या जवानांनी उधळून लावला आहे. या मोठ्या हल्ल्यानंतर आता सैन्य दलाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात आली आहे. नाकाबंदी आणि बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे.
नुकत्याच झालेल्या बडगाम जिल्ह्यातील चकमकीत तिघा अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. लष्कर ए तोयबाच्या तिघा अतिरेक्यांचा सैन्यानं चमकीत खात्मा केला होता. अतिरेकी एका ठिकाणी लपल्याची माहिती मिळाल्या नंतर जवानांनी सर्च ऑपरेशन राबवले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाई तिघा अतिरेक्यांना ठार करण्यात आलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या अवघ्या काही दिवसांच्या आधी जम्मू काश्मिरातील आत्मघातकी हल्ल्यानं संपूर्ण देशभरातल्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनाही सतर्कच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
https://twitter.com/ani_digital/status/1557564520649740289?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
Terrorist Attack in Kashmir 3 Soldier Martyred 2 Terrorist Killed