शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१३६ इन्फंट्री (टेरिटोरियल आर्मी) मध्ये पदभरती…बघा, पात्रता, आवश्यक दस्तावेज

by India Darpan
मार्च 20, 2025 | 5:14 pm
in राष्ट्रीय
0
Untitled 50

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा):136 व्या इन्फंट्री टेरिटोरियल आर्मी पर्यावरण, महार बटालियन मध्ये माजी सैनिक, पर्यावरण मंत्रालय केंद्र शासन व राज्य शासन (वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी) यांच्यासाठी २१ ते २३ एप्रिल या कालावधीत धुळे जिल्ह्यातील एमआरपीएफ कॅम्प ग्राऊंड, धुळे येथे विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी शारीरिक निकष आणि वैद्यकीय तपासणीसाठी कागदपत्रांसह ५.३० वाजता नियोजित स्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन लेफ्पनंट कर्नल अमित प्रभू यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

यात महाराष्ट्रातील माजी सैनिक, माजी सैनिक, पर्यावरण मंत्रालय केंद्र शासन व राज्य शासन (वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी) यांच्यासाठी शिपाई जनरल ड्यूटी या पदासाठी ४४ पदांची भरती केली जाणार आहे. तसेच संपूर्ण भारतातील संपूर्ण माजी क्लर्क आणि माजी सैनिक यांच्यासाठी कारकून( Clerk) 6 पदे, आचारी (Cook) 1 पद, नाभिक (Hair Dresser) 1 पद, मसालजी ( Mess keeper) 1 पद, वेटर (Steward) 1 पद, लोहार(Black Smith) 1 पद अशा एकूण 55 पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

माजी सैनिक व सेवानिवृत्त महिला यांच्यासाठी पात्रता

  1. वयोमर्यादा 50 वर्षांपेक्षा जास्त नसावी
  2. माजी सैनिक (केवळ पेन्शनधारक) साठी किमान वयोमर्यादा नाही परंतु सेवानिवृत्ती नंतर 5 पेक्षा अधिक वर्षे झालेले नसावेत.
  3. पर्यावरण मंत्रालय, केंद्र शासन आणि वन विभाग, महाराष्ट शासनाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी नाही परंतु सेवानिवृत्ती नंतर 5 पेक्षा अधिक वर्षे झालेले नसावेत.
  4. वैद्यकीय श्रेणी 1 (SHAPE 1) असवी.
  5. डिस्चार्ज पुस्तकातील नोंदीनुसार उमेदवारांचे चारित्र्य अनुकरणीय व खूप चांगले अशा स्वरूपाचे असावे.
  6. माजी सैनिक (केवळ पेन्शनधारक), माजी महिला कर्मचारी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, राज्य वन विभाग (स्वच्छेने सेवानिवृत्त) केंद्र शासन व राज्य शासन (वन विभाग) यात 20 वर्षाच्या सेवेसह उमेदवार पात्र असतील.
  7. माजी सैनिक उमेदवारांसाठी उंची 160 से.मी. असावी. पर्यावरण मंत्रालय केंद्र शासन व राज्य वन विभागांचय माजी महिला कर्मचारी यांच्यसाठी उंची 150 से.मी. असावी.
  8. पुरूष उमेदवारांचे वजन 50 किलो आणि महिला उमेदवारांचे वजन 42 किला इतके असावे.
  9. माजी सैनिकांसाठी छाती 82 सेमी (05 सेमी पेक्षा जास्त फुगवता आली पाहिजे)
  10. फक्त महिलांसाठी 05 सेमी आणि पेक्षा जास्त फुगवता आली पाहिजे.

शारीरिक क्षमता चाचणी

  1. 1 मैल धावणे शर्यत 7 मिनिटे 9 सेकंदात पूर्ण करता आली पाहीजे.
  2. 9 फूट खड्डा उडी मारून पार करता आली पाहीजे.
  3. नियमानुसार बीम लेवल पार करता आली पाहिजे.
  4. संतुलन बीमवर चालणे.

आवश्यक दस्तावेज

  1. पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO)
  2. डिस्चार्ज बुक/ ESM ओळखपत्र
  3. 8 पासपोर्ट आकाराचे फोटो
  4. शैक्षणिक कागदपत्रे
  5. अधिवास प्रमाणपत्र/ आधार कार्ड

महिलांमध्ये रोपवाटिकेत वृक्षारोपण आणि रोपे तयार करण्याची कार्यक्षमता असावी. निवड झालेल्या पुरूष/स्त्री उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तसेच शारिरीक तपासणी व वैद्यकीय तपासणी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत मंडळाच्या अधिकारी यांच्यामार्फत घेतली जाईल.

भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आणि रिक्त पदांवार आधारीत असेल. प्रादेशिक आर्मी पर्यावरण महार बटालियनमध्ये कोणत्याही प्रकारच्या पेन्शनची तरतूद नाही. भारतीय लष्कर आणि प्रादेशिक सैन्यातील माजी सैनिक आणि पर्यावरण विभाग, केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्वीची पेन्शन सुरू असणार आहे. सुरवातीला फक्त दोन वर्षासाठी भरती केली जाणार असून नंतर जवानांच्या कामाच्या व शिस्तीच्या मुल्यमापनाच्या आधारावर, त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी प्रादेशिक सैन्याच्या नियमांनुसार नोकरी एक वर्षासाठी वाढविली जाईल. प्रादेशिक आर्मी पर्यावरण महार बटालियनमध्ये कर्मचारी वयाच्या 50 वर्षापर्यंतच काम करून शकतो. रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात / घटनेची जबाबदारी भरती मंडळाची राहणार नाही. या मोफत भरती सेवा आहेत. यात भरती पदासाठी कोणीही उमेदवार लाच देतांना पकडला गेला तर त्याची नियुक्ती रद्द केली जाईल. कागदपत्रांतध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा ओव्हर राईट केलेली आढळ्यास त्याचा भरतीसाठी विचार केला जाणार नाही. चुकीची माहिती अथवा कागदपत्रे सादर केल्यास कायद्यानुसार शिक्षा किंवा नोकरीतून बडतर्फ केले जाईल. रॅलीच्या ठिकाणी मोबाइल वापरास बंदी आहे. अधिक माहितीसाठी 9168168136 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये जगप्रसिद्ध कार्डीओलॉजिस्ट प्रा. यान कोवाच यांनी तासाभरात केल्या या दोन शस्रक्रिया…

Next Post

या दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद.. दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

Next Post
nal 11

या दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद.. दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

ताज्या बातम्या

rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011