वडोदरा (गुजरात) – ‘रंजल्या जीवाची, धरी मनी खंत | तोचि खरा साधू , तोचि खरा संत…॥’ असे एक मराठी गीत आहे. याचा प्रत्यय सध्या कोरोना काळात गुजरात राज्यामध्ये येत आहे. प्रत्यक्ष साधू -संत, पुजारी लोक कोरोना सणांच्या सेवेत गुंतलेले दिसत आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने संपूर्ण देश व्यापून टाकला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स पूर्ण भरल्या आहेत. तर बर्याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व जीवरक्षक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. देशातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक संस्थांनी रुग्णांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत, अनेक मंदिरांनी मानवी सेवेसाठी पुढाकार घेतलेला दिसून येत आहे.
गुजरातमधील वडोदरा येथील श्री स्वामीनारायण मंदिराचे रूपांतर कोविड रुग्णालयात झाले असून येथील साधू, संत सतत कोरोना रूग्णांच्या सेवेत गुंतलेले दिसतात. मंदिराकडून घडत असलेल्या मानवी सेवेच्या या चित्राचे ट्विटरवरून अनेकांनी कौतुक केले आहे.
आयपीएस अधिकारी आर.के. विज यांनी एक ट्विट केले असून त्याला एक सुंदर दृश्य म्हटले आहे.
‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव मानवाच्या अंतरी… ‘
अशी भावना यातून दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जणू काही’मानव सेवा हीच, ईश्वर सेवा ‘ अशी भावना देखील यातून व्यक्त होत आहे. देशांमधील अनेक धार्मिक संस्था आणि मठ, मंदिरासाठी श्री स्वामीनारायण मंदिराने आदर्श निर्माण केला आहे.
एक मंदिर अस्पताल में बदल गया,
अब इस मंदिर के पुजारी और साधु कोविड रोगियों की देखभाल कर रहे हैं।#CoronaSecondWave pic.twitter.com/AaxZmrmw0B— mrigendra pandey (मृगेंद्र पांडेय) (@mrigendrabhai) April 19, 2021