मुंबई – भारतीय माणसाला टीव्ही वरील कार्यक्रमाचे प्रचंड आकर्षण असते. अबालवृध्द विशेषत: महिला वर्गाला टीव्हीवरील मालिका आणि अन्य शो खूप आवडतात. सध्या अनेक रिअॅलिटी शो टीव्हीच्या छोट्या पडद्यावर वर्चस्व गाजवत आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीमुळे या शोमध्ये अनेक अभिनेते अभिनेत्री किंवा कलाकार सहभाग घेतात. हा कार्यक्रम हिट करण्यात या होस्टचीही विशेष भूमिका असते. सध्या बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतात. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हे स्टार्स प्रत्येक एपिसोडसाठी किती शुल्क घेतात, हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल.
१) बॉलिवूडचे सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून ‘केबीसी’ क्विझ रिअॅलिटी शोचे होस्ट आहेत. पहिल्या सीझनमध्ये त्यांनी प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेतले. मात्र यानंतर प्रत्येक वेळी सीझन ११ पर्यंत त्याची फी वाढून आता ३ कोटी ५० लाख झाली आहे.
२) अभिनेता शाहरुख खानने यापुर्वी अनेक रिअॅलिटी शो होस्ट केले आहेत. पण ‘टेड टॉक’चे होस्ट म्हणून त्याला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. शाहरुख या शोसाठी दर आठवड्याला ३० कोटी फी घेत होता.
३) बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान हा टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध होस्ट मानला जातो. तो गेल्या अनेक सीझनपासून बिग बॉस या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. यापूर्वी तो प्रत्येक एपिसोडसाठी ६ कोटी ५० लाख आकारत असे. आता मात्र ते शुल्क वाढवून ८ कोटी ५० लाख करण्यात आले आहे.
४) अभिनेत्री शिल्पा शेट्टी डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर’ मध्ये दिसते. ती या शोचे सूत्रसंचालन करत नाही पण एक जज् म्हणून ती खूप फी घेते. या शोच्या प्रत्येक आठवड्यासाठी ती १४ कोटी शुल्क घेते.
५) बॉलिवूड चित्रपट निर्माते अनुराग बसू देखील शिल्पा शेट्टी प्रमाणे ‘सुपर डान्सर’ या रिअॅलिटी शोचे जज आहेत. ते एका आठवड्यात ७ कोटी कमावतात.