इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजचे युग हे सोशल मिडीयाचे आहे सोशल मीडियाच्या या युगात एका रात्रीतून कोण फेमस होईल याचा काही नेम नाही. अर्थात त्याकरिता नशिबा सोबत कष्टाचीही साथ लागते. गेल्या पाच वर्षात काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. त्यांचा प्रवास वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल. तेलंगानाच्या ६२ वर्षीय मिल्कुरी गंगव्वाची यश कथा देखील अशीच रंजक आहे.
मिल्कुरी गंगव्वाचीकडे ना पुरेसे शिक्षण आहे, ना त्यांची परिस्थिती खूप चांगली आहे ना त्यांना प्रसिद्धीचे वलय आहे. मात्र अतिशय प्रतिकूल परीस्थितीवर मात करत उतारवयात ही महिला आपले स्थान निर्माण करते आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वत:ची ओळख निर्माण करते, हे निश्चितच कौतुकास्पद आणि आश्चर्यकारक आहे.
मिल्कुरी गंगव्वा या महिलेचे नाव आहे आजींच्या जावयाने त्यांना घेऊन व्हिडिओ बनवायला सुरूवात केली. यात काही व्हिडिओमध्ये गंगव्वा आजी अॅक्टिंग करतानाही दिसत होत्या. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. सोशल मीडियावर आजी प्रसिद्ध व्हायला लागल्यानंतर त्यांना तेलगु चित्रपट आणि टीव्ही सीरियलमधून ऑफरही यायला लागल्या. मग त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि एका टिव्ही शोमध्ये काम केले. त्यानंतर मग या आजी आता खेडवळ आजी राहिल्या नसून एक अभिनेत्री झाल्या. आता तर त्यांची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, तेलगु आणि तमिळ चित्रपटातील बरेच कलाकार या आजींना फॉलो करतात. त्यामुळे मजूर ते सेलिब्रिटी हा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. फेमस आजी मिल्कुरी गंगव्वाने आतापर्यंत ‘मल्लेशाम इस्मार्ट शंकर’,’ एसआर कल्यानामदापम’, ‘राजा राजा छोरा’, ‘लव स्टोरी’ आणि ‘गॉड फादर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
https://twitter.com/cnni/status/1295991677820325893?s=20&t=8vLUzOwAnpSrOnL8_mdIjQ
याशिवाय आजीने अनेक तेलगु टीव्ही शोजमध्येही काम केले आहे. सोशल मीडिया फेम गंगव्वा आजी आज प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. ६२ वर्षीय मिल्कुरी गंगव्वा या तेलंगानाच्या लम्बाडीपल्ली गावातील रहिवासी आहेत. मिल्कुरी यांची जीवनकहाणी खऱ्या अर्थाने एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे.
खरे तर यूट्यूबर होण्याआधी कुटुंबातील ५ लोकांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या. मिल्कुरी फक्त पहिलीपर्यंत शिकल्या आहेत. लग्नानंतर त्यांचे पती दारू पिऊन त्यांना मारझोड करायचे. कुटुंबातील गरीबी आणि शिक्षण नसल्याने मजुरी करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. स्वत:ला शिक्षण नसल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व वेळीच पटले आणि त्यांनी आपल्या ४ मुलांच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिले नाही. त्यामुळेच त्यांची मुले आज उच्च शिक्षित असून आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. मिल्कुरी यांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल इतक्या त्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत.
याला कारण म्हणजे गंगव्वा यांचे जावई श्रीकांत श्रीराम माय व्हिलेज शो (My Village Show ) नावाचं एक युट्यूब चॅनल चालवतात. या चॅनलवर ते आपल्या गावातील काही ना काही गोष्टी आणि कधी विनोदी व्हिडिओज दाखवतात. त्यांच्या चॅनेल स्थानिक भाषिकांना चांगलाच आवडत असल्याने मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. एकदा श्रीकांत यांनी एका व्हिडिओत आपल्या सासूला म्हणजेच मिल्कुरी यांच्यावर एक व्हिडिओ बनवला.
गंगव्वा आजीचा साधाभोळा आणि निरागस चेहरा बघताच अनेकांना हा व्हिडिओ आवडला आणि काही दिवसांत तो प्रचंड व्हायरल झाला.त्यांची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की तेलगु आणि तमिळ चित्रपटातील बरेच कलाकार या आजींना फॉलो करतात.सोशल मीडियावर आजी गाजायला लागल्यानंतर त्यांना तेलगु चित्रपट आणि टीव्ही सीरियलमधून ऑफरही यायला लागल्या आहेत.
https://twitter.com/YouTube/status/1299946319792881665?s=20&t=8vLUzOwAnpSrOnL8_mdIjQ
Telangana Women Milkuri Gangavva You Tuber Success Story