इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या देशभरात मंदिर आणि मशीद यांचा वाद सुरू झाला आहे. विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे टाळायला हवे. भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा देश आहे. त्यातच भाजप नेते आणि एमआयएमचे नेते ओवेसी यांच्यामध्ये रोजच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे हा वाद संपण्या ऐवजी आणखी चिघळत चाललेला दिसतो. त्यातच आता तेलंगाणाच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी वादग्रस्त विधान केले आहे.
वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणात शिवलिंग कथितरित्या आढळल्यानंतर अनेकांमध्ये जणू अवास्तव उत्साह संचारला आहे. तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष एस.के. बंदी यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना खुले आव्हान दिले आहे. बंदी म्हणाले की, राज्यातील सर्व मशिदी खोदून काढू तिथे शिवलिंग सापडले तर ते आमच्या स्वाधीन करा. आणि जर मृतदेह सापडले तर तुमचे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा देशभर चर्चा सुरू झाली आहे.
बंदी म्हणाले की, जिथे मशिदीच्या परिसरात उत्खनन केले जाते तेथे शिवलिंग सापडतात. त्यामुळे राज्यातील सर्व मशिदी खोदून काढू, असे मी ओवेसींना आव्हान देत आहे. जर मृतदेह सापडले तर ते तुमचे (मुस्लिमांचे) आहेत. शिवलिंग सापडले तर ते आमच्या स्वाधीन करा.
करीमनगरमध्ये ‘हिंदू एकता यात्रे’ला संबोधित करताना बंदी बोलत होते. बंदी यांनी दावा केला की, तेलंगणात पूर्वी मुस्लिम शासकांनी अनेक मंदिरे पाडली. आणि त्यांच्या जागी मशिदी बांधल्या. ओवेसींना खुले आव्हान देत त्यांनी राज्यातील सर्व मशिदींमध्ये उत्खनन करण्याचे आवाहन केले. आणि हिंदू धार्मिक चिन्हे आढळल्यास हिंदू त्या ताब्यात घेतील, असेही ते म्हणाले.
भाजप सत्तेवर आल्यास तेलंगणात रामराज्य स्थापन करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. करीमनगरचे खासदार म्हणाले, की भाजप सत्तेवर आल्यास आम्ही सर्व मदरसे नष्ट करू, अल्पसंख्याकांना दिलेले आरक्षण संपवू, आणि एससी, एसटी, यांना अतिरिक्त कोटा देऊ, आम्ही उर्दूला दुसरी अधिकृत भाषा म्हणून कायमची काढून टाकू, कारण यात मदरशांवरची भूमिका महत्त्वाची ठरते.
https://twitter.com/ANI/status/1529645358443220994?s=20&t=hAZMImzO6MsXenfke4h71A