नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांची लवकरच नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे. अब कि बार किसान सरकारचा नारा देत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता राव यांच्या सभेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
तेलंगणा राज्यात एक आदर्श मॉडेल तयार करून देशभरात शेतकरी, कष्टकरी, दिन-दलित, आर्थिक मागास वर्ग अशा सर्व घटकांचा विकास करत अवघ्या नऊ वर्षात तेलंगणा राज्याचा कायापालट केलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्रातील सुरु असलेली घोडदौड नाशिक जिल्ह्यात पोहचली असून जिल्ह्यातील शेतकरी नेते तथा भारत राष्ट्र समितीचे समन्वयक नानासाहेब बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभाग समन्वयक दशरथ काका सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तथा महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनीं आज भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आदेशानुसार नाशिक विभागीय समन्वयक मा. दशरथ काका सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांच्या उपस्थितीत नाशिक विभागीय पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या पक्ष प्रवेश सोहळ्यात भारत राष्ट्र किसान समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. माणिकराव कदम यांच्या हस्ते विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारत राष्ट्र किसान समितीत प्रवेश केला. यावेळी नानासाहेब बच्छाव यांची भारत राष्ट्र किसान समितीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याची घोषणा मा. माणिकराव कदम यांनी केली.
यांनी केला प्रवेश
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बोराडे, वैभव देशमुख, नवक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष भगवान सोनवणे, शेतकरी संघर्ष संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत बच्छाव, बाळासाहेब बच्छाव, डॉ. लक्ष्मण साबळे, मनसे वैद्यकीय आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख डॉ. बिलाल शेख, संपतराव जाधव, रामचंद्र निकम, शेतकरी संघर्ष संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष सचिन कड, शेतकरी संघर्ष संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मुकुंद आहेर, शेतकरी संघर्ष संघटनेचे युवा जिल्हा संघटक अभयसिंग सूर्यवंशी, शेतकरी संघर्ष संघटनेचे युवा जिल्हा सचिव संपत जाधव, संदीप खुटे, प्रा. रोहित पाटील, प्रा. ज्ञानेश्वर बांगर, विक्रांत ढगे, अरुण जाधव, विशाल सांगोरे, अमीर शेख, नीरज जैन, प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक सुभाष आहिरे, राजेंद्र आहीरे, रामकृष्ण जाधव, निलेश नागरे, सागर थोरात, विनय पवार, किरण उगले, रवी कनक, अमीर शेख, अनिल जाधव, समाधान बाविस्कर, अमोल साळुंके, अमोल जाधव, अमित जाधव, विश्वनाथ जाधव, राम गहिरे, सुनील बागुल, राजेंद्र म्हस्के, अरुण निकम, रवींद्र आहेर, योगेश निकम, प्रवीण गायकवाड, नरेंद्र पाटील, गोरख मगर, संजय सरगर, सावळीराम जाधव, भरत गायकवाड, बाळासाहेब पारखे, विलास इंगळे, संदीप शिंदे, दौलत निवेकर, अभीजित पगार, विशाल निकम, भूषण पगार, ओंकार बुरकुले, सुमित बच्छाव, निखिल बच्छाव, राहुल बच्छाव यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी के. चन्द्रशेखर राव यांच्या कार्याने प्रभावित होऊन अबकी बार किसान सरकार घोषणा देत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला असून आगामी काळात गाव तेथे भारत राष्ट्र समिती असा निर्धार उस्फूर्तपणे करण्यात आला.