मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत मनसेने यावेळेस मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले होते. पण, या निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीणमध्ये गेल्या वेळेस असलेला एकमेव आमदार राजू पाटील यांचा सुध्दा शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी पराभव केला. तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा माहिम मतदार संघातून पराभव झाला. त्यानंतर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
त्या पंडित यांनी म्हटले आहे, विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या micro management ला १००/१००. पण तरीही……राजसाहेब ठाकरे #एकनिष्ठ #सदैवसोबत. आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू असे म्हटले आहे.
त्याचप्रणा तेजस्विनीने मनसे नेते शुंभराज चव्हाण यांनी केलेल्या पोस्टला रिव्टिट केले आहे. चव्हाण यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राजसाहेब, कालपासून मनाला हुरहूर लागली आहे. आपण मागची ५ वर्षे मनापासून खूप कष्ट आणि कामे केले, असंख्य मुलाखती दिल्या, महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला, रोज सकाळी सामान्य जनतेसाठी OPD भरवली, त्यांचे प्रश्न सोडवले, एकदम साधे साधे प्रश्न, नोकरी लावणे, अडकलेली सरकारी कामांचा पाठपुरावा, कलाकारांचे प्रश्न मार्गी लावले, मराठी साठी भांडला, मोदींसमोर आमचे गाऱ्हाणे मांडले, अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला, टोल मुक्तीसाठी प्रयत्न केले, काय केले आहे ह्याचे पुस्तिका छापण्यापर्यंत कामे केली, पुण्यात पूर आल्यावर सर्वात प्रथम पोहचला, सगळ्या राजकीय मंडळींशी चांगले संबंध ठेवले. उद्धवच्या शप्तविधीला गेला, शिंदेंना आपलेसे केले, फडणवीसांना भावाप्रमाणे घरी बोलवून ओवाळले. खूप सुंदर क्षण तुम्ही महाराष्ट्राला दिले. मराठी संस्कृती जोपासली. राजसाहेब, आम्ही किती भाग्यवान आहोत की आम्ही तुमच्या era मध्ये जन्मलो. आम्हाला young बाळासाहेब बघायला नाही मिळाले पण आम्हाला राजसाहेब मिळाले. बोलण्याचे कौशल्य, कलात्मक मांडणी, aesthetic touch, साधे दिवाळीच्या लाइटिंगचे उदाहरण घेतले तरी चालेल. काय नटवता तुम्ही शिवाजी पार्क, गोदा पार्क असो किंवा संग्रहालय असो. अहो, पैठणी शाल सुद्धा ज्या ऐटीत तुम्ही सत्कारावेळी घालता ती सुद्धा कलात्मक वाटते.
एक सांगतो साहेब, तुमच्यासाठी वाटणारे माझ्यासारख्या असंख्य लोकांचे प्रेम कधीच कमी होणार नाही. शर्मिला वहिनींचा grace आणि intelligence सुद्धा खूप भावतो, माझ्या आई सारख्याच वाटतात. तुमची मुलाखत आली किंवा भाषण लागले की सगळे सोडून ते बघण्याचे उत्सुकता कधीच कमी होणार नाही. आज पर्यंत मी २००८ पासून क्वचितच तुमची मुलाखत चुकवली असेन.
तुम्ही बाळासाहेबांच्या संस्कारात तयार झालेले राजा माणूसच आहात आणि कायम रहाल. सगळ्यात जास्त तुम्हाला त्यांचा सहवास मिळाला.
अविनाशदादा, राजूदादा, अमित, संदीप, बाळा नांदगावकर ह्यांच्यासाठी मला खूप वाईट वाटते, पण असो अजूनही वेळ आपली नाही. जनता एक ना एक दिवस नक्की संधी देईल. खरच राजकारण किती अवघड आहे साहेब, पण असे म्हणतात god keeps the best for the last आणि मला वाटते तुमची कुलदेवी आई एकवीरा देवी नक्कीच तुम्हाला भरभरून यश देणार.
मी नेहमी तुमची बाजू, आणि मला आवडलेले तुमचे काम आणि मनसेचे ground work जगाला ओरडून सांगत राहीन. साहेब, तुम्ही राजकारण सोडून शेकडो गोष्टी करू शकता आता ५ वर्ष त्या प्लिज करा – हे निराशजनक राजकारणाकडे दुर्लक्ष करा. तुमचे रोजचे व्यंगचित्र बघायला कसली धमाल येईल, आम्हाला documentaries suggest करा, एखादा अग्रलेख लिहा, आणि फिल्ममेकिंग मध्ये वेळ घालवा. आपले brilliant mind ह्या महाराष्ट्राला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मिळत राहूदे.