जोधपूर (राजस्थान) – ‘सोळा वरीस धोक्याचं’ असे म्हटले जाते. परंतु सोळाव्या वर्षी देखील आपल्या कार्यकर्तृत्वाने इतिहासात स्थान निर्माण करणारे अनेक पुरुष होऊन गेले आहेत. सध्याच्या काळात मात्र तरुणांना योग्य दिशा मिळत नसल्याची भरकटले जातात, असे म्हटले जाते याचा प्रत्यय समाजात वारंवार दिसून येतो.
जोधपूर येथील पोलिसांनी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे टोळीचा म्होरक्या हा १६ वर्षीय अल्पवयीन आहे. सोशल मीडियावर ग्रुप तयार करून तो टोळीतील सदस्यांना चोरीच्या ठिकाणाची माहिती देत असे आणि त्यांना कामेही देत. डेरिया गावात लाखो रुपयांच्या चोरीच्या आरोपाखाली पकडलेल्या या टोळीला जोधपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच टोळीच्या सदस्यांनी अनेकदा अफूची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जोधपूर जिल्ह्यातील डेरिया गावात चोरट्यांनी एका बंगल्यात प्रवेश केला, यावेळी घराचे सर्व दरवाजे बंद होते, परंतु चोरांनी मागील छोटी खिडकी तोडून आत प्रवेश केला. सुमारे २ लाख रुपये रोख व दहा तोळे सोन्याचे दागिने शिवाय अनेक चांदीचे दागिने पळवून नेले. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, ही छोटी खिडकी पाहून तेथून कोणीही मोठी व्यक्ती आत जाऊ शकत नाही, असे वाटत होते.
यानंतर पोलिसांनी तरुण वयातील मुलांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका मुलाला संरक्षणात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावर त्यांनी धक्कादायक माहिती मिळाली. यात पकडलेल्या मुलाने सांगितले की, त्याच्या टोळीने पाचपदरा पोलीस ठाण्याच्या गोदामातून या वर्षी जानेवारी महिन्यात अनेक वेळा दहा क्विंटल डोडा अफू चोरली होती. त्याच्या माहितीच्या आधारे पोलीस टोळीतील अन्य सदस्यांचा शोध घेत आहेत.
सदर टोळी हायटेक शैलीत चोरी करत असे. ही मुले आधी घर किंवा एखादे ठिकाण ठरवायचे, यानंतर चोरीची वेळ ठरवली जात होती. टोळीचा १६ वर्षीय प्रमुख संपूर्ण प्लॅन बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या ग्रुपमधील आपल्या टोळीतील सदस्यांना माहिती दिली जाईल. गरजेनुसार तो टोळीतील सदस्यांना कामे वाटूनही देत असे. यामध्ये सर्व सभासदांना केव्हा आणि कोणत्या वेळी पोहोचायचे आहे, कोणते काम करण्याची जबाबदारी कोणाची असेल याची संपूर्ण माहिती देण्यात येत होती. यानंतर सर्वजण एका ठिकाणी जमायचे आणि बोलेरो कॅम्परमध्ये बसून चोरी करायला निघायचे.