इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारत हा खेड्यांचा देश आहे असे म्हटले जाते, तसेच प्रत्येक खेडे हे आगळ्यावेगळ्या असून त्याचे काही वैशिष्ट्य असतात. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा म्हणजे समाज माध्यमावर वावरण्याचा आहे. साहजिकच अबाल वृद्ध हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येतात. परंतु एका गावांमध्ये जवळपास सर्वच जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून इतकेच नव्हे तर ते युट्युब वर काहीतरी वेगळे तयार करत असतात. अशा या गावाचे वेगळी कथा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटते.
सध्या व्हिडीओ बनवण्याची क्रेझ खूप वाढली आहे. प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की YouTuber बनणं ही एक मोठी कमाई आहे. देशात एक असं गाव आहे जिथे प्रत्येक घरात एक YouTuber आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून तिल्दा परिसर जवळपास 45 किमी अंतरावर तुळशी गाव आहे. विशेष म्हणजे या गावात घराघरात एकतरी युट्यूबर आहेच. या गावाची लोकसंख्या सुमारे 3 हजार आहे.
विशेष म्हणजे या तीन हजार जणांपैकी एक हजारांहून अधिक जण युट्युबर आहेत यावरून तुम्हाला युट्यूबची क्रेझ समजू शकते. आपण या गावात गेलात तर तुम्हाला रस्त्यावर लोक व्हिडीओ बनवताना सहज दिसतील.
ग्रामस्थ सांगतात की, येथे 85 वर्षांच्या आजीपासून ते 15 वर्षांच्या नातवापर्यंत सर्व व्हिडिओसाठी अभिनय करतात. ज्ञानेंद्र शुक्ला आणि जय वर्मा हे दोघेही याच गावातील रहिवासी आहेत. सध्या ते दोघे युट्यूबवर व्हिडीओ बनवतात. दोघांनीही नोकरी सोडली आणि त्यानंतर युट्यूब चॅनल सुरू करून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
खरे तर ज्ञानेंद्र सरकारी नोकरी करायचा. तो एसबीआयमध्ये नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम करत होता. आतापर्यंत त्याने तब्बल 250 व्हिडीओ बनवले आहेत आणि त्याच्या चॅनेलवर 1.15 लाख सब्सक्राइबर्स आहेत. जय वर्मा यांनी एम.एस्सी केली असून ते मुलांना शिकवायचे. यातून त्यांना 15 ते 20 हजार रुपये मिळायचे. मात्र त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून त्यांना या चॅनलमधून दरमहा 30 ते 35 हजार रुपयांची कमाई होत आहे. त्यानंतर या दोघांना पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी YouTube साठी कंटेंट बनवायला सुरुवात केली.
पिंकी साहू एक कलाकार आहे. तिने सांगितलं की, जेव्हापासून येथे व्हिडिओ कंटेंट बनवण्याची क्रेझ वाढली आहे, तेव्हापासून महिलांना भरपूर काम मिळू लागले आहे. या व्हिडिओमध्ये ती दीड वर्षांपासून अभिनय करत आहे. जरी महिला घरासमोर फारशा बाहेर पडल्या नाहीत. मात्र यूट्यूबच्या माध्यमातून परिसरातील लोकांच्या विचारात बदल झाला आहे. महिलाही व्हिडिओजमध्ये सहभागी होऊन उत्तम अभिनय करू लागल्या आहेत.
Technology Youtuber Village Earning Money
Chhatisgarh