इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उन्हाळा चांगलाच वाढतो आहे. सामान्यपणे होळीच्या पूर्वी थंडी आणि होळीनंतर उकाडा असं चित्र असतं. यंदा मात्र कधीपासून उकाड्याचा त्रास सुरू झाला आहे. उन्हाच्या झळा चांगल्याच बसत आहेत. नुकताच एप्रिल सुरू झाला आहे. मार्च महिन्यात देखील उन्हाचा पारा चांगलाच चढल्याचे चित्र होते. यातच ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारी तपमान वाढ आहेच.
उन्हाची काहिली वाढली की एसी, पंखे, माठ किंवा फ्रीजमधील गारेगार पाण्याला पर्याय नाही. उन्हाळा सुरू झाल्याने कूलर आणि पंख्यांची मागणी वाढली आहे. मात्र, एसी, पंखे सोडताना विजेच्या बिलाचा एकदा देखील समोर दिसत असतो. यात एक गंमतीची गोष्ट म्हणजे, काही लोक वीज बिल कमी करण्यासाठी पंख फुल सोडण्याऐवजी ४ नंबरवर फॅन चालवतात. स्लो फॅन चालवल्याने खरोखरच विजेचा वापर कमी होतो का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितेय का?
पंख्याचा वीज वापर त्याच्या वेगाशी संबंधित असतो. असे असले तरी प्रत्यक्षात तो रेग्युलेटरवर अवलंबून असतो. पंख्याच्या गतीने वीज वापर कमी किंवा वाढवता येतो असे रेग्युलेटरच्या आधारे सांगितले जाते. दुसरीकडे, आता अनेक प्रकारचे नियामक येऊ लागले आहेत. बाजारात असे अनेक रेग्युलेटर आहेत, ज्यांचा वीज वापरावर कोणताही परिणाम होत नाही आणि ते फक्त पंख्याच्या गतीपुरते मर्यादित आहेत. वास्तविक, अनेक फॅन रेग्युलेटर व्होल्टेज कमी करून फॅनचा वेग नियंत्रित करतात. तर काही वेग कमी करतात, मात्र, त्यांचा व्होल्टेजशी काहीही संबंध नाही.
जे फॅन रेग्युलेटर व्होल्टेज कमी करून फॅनचा वेग नियंत्रित करतात, ते वीज वाचवत नाहीत. वास्तविक, रेग्युलेटरचा वापर पंख्याकडे जाणारे व्होल्टेज कमी करण्यासाठी केला जातो. या प्रकरणात पंखा कमी उर्जा वापरतो, परंतु तो उर्जा वाचवत नाही, थोडक्यात काय, तर पंख्याचा वेग कमी ठेवल्याने विजेच्या वापरावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
Technology Tips Fan Speed Electricity Relation