इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याचा जमाना हा स्मार्टफोनचा आहे. परंतु भविष्यात स्मार्टफोन असेल की नाही, याची कल्पनाही कुणी करु शकत नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एक भविष्यवाणी केली आहे. ते जाणून तुम्हाला चक्क धक्काच बसेल.
सध्या स्मार्टफोनच्या साहाय्याने इंटरनेट व सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणार्यांची संख्या वाढतच आहे. जगात सर्वत्रच हा बदल दिसून येत आहे. काही ठिकाणी अति वेगाने बदल होत असून आपण त्याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र भविष्यात स्मार्टफोन खिशात ठेवून फिरण्याची गरज भासणार नसल्याचे मत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केले आहे. आजच्या काळात स्मार्टफोन खरेदी करताना प्रोसेसर, कॅमेरा, मेमरी स्टोअरेज याबरोबरच सेन्सरचा देखील विचार करणे आवश्यक ठरते. कारण स्मार्टफोनमधील बहुसंख्य कार्ये ही सेन्सर्समार्फतच होतात. दैनंदिन जीवनात आपण स्मार्टफोनवर ज्या अनेक गोष्टी करत असतो, त्यातही सेन्सर्स आपली मदत करत असतात. त्यांच्यामुळे स्मार्टफोनचा वापर करणे सोपे होते. परंतु २०३० पर्यंत हे स्मार्टफोनचे युग संपणार आहे.
खरे म्हणजे स्मार्टफोन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असून सुमारे १० वर्षात स्मार्टफोनमध्ये प्रचंड बदल झालेला पाहायला मिळत आहे. कारण स्मार्टफोन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. आज स्मार्टफोनमध्ये हाय-टेक कॅमेऱ्यांपासून ते सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि जलद चार्जिंग ते वायरलेस चार्जिंगपर्यंत प्रत्येक आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश केला जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्र आणखी खूप वेगाने विकसित होत असून स्मार्टफोन कंपन्या त्यात सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहेत.
भविष्यात स्मार्टफोनच्या स्वरूपाबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, येणाऱ्या काळात स्मार्टफोन्स इतके हायटेक बनतील की ते गायब होतील. विशेषतः मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी हा दावा केला आहे. याबाबत बिल गेट्स यांनी अंदाज वर्तवला की, इलेक्ट्रॉनिक टॅटू स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. म्हणजेच भविष्यात स्मार्टफोनऐवजी इलेक्ट्रॉनिक टॅटूचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात स्मार्टफोनला खिशात घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही, तर स्मार्टफोन आपल्या शरीरात इंटिग्रेट केला जाईल. म्हणजेच हे टॅटू केवळ लहान आकाराचे चिप असतील आणि ते मानवी शरीरात बसवले जातील. मग आपला फोन कोणी चोरूनही घेणार नाही आणि दुसरा कोणी हातही लावू शकणार नाही, असा फायदा असला तरी त्याची काही तोटेही भविष्यात निर्माण होऊ शकतात.
यापुर्वी नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही भविष्यातील स्मार्टफोन संदर्भात असेच मत मांडले होते. सन २०३० पर्यंत, स्मार्टफोनच्या सामान्य इंटरफेसमध्ये मोठा बदल दिसून येईल, असे त्यांचे म्हणणे होते. या वेळेपर्यंत 6G तंत्रज्ञान आलेले असेल आणि स्मार्टफोनऐवजी स्मार्ट चष्मा किंवा अन्य डिव्हाईसचा वापर केला जाईल. सन २०३० पर्यंत स्मार्टफोनशी संबंधित अनेक गोष्टी थेट शरीरात इंटिग्रेट केल्या जाऊ लागतील, असेही पेक्का यांचे म्हणणे आहे. म्हणजे भविष्यात आपल्या हातातील फोन चोरीला जाण्याचे प्रकार बंद होतील, तसेच आपला फोन घरातील अन्य कोणी हिसकावून घेण्याची शक्यता राहणार नाही.
Technology Smartphone Future Bill Gates
Microsoft
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/