इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोबाईलचा वापर हा आता आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा झाला आहे. मात्र, हा वापर करताना काळजी घेणेही आवश्यक आहे. अन्यथा दुर्घटनाही घडू शकते. असाच एक प्रकार घडला असून मोबाईलमुळे गर्भवतीसह तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे.
आंघोळ करून आल्यानंतर ओल्या हातानेच मोबाईल चार्जिंगला लावणाऱ्या महिलेचा करंट लागून मृत्यू झाला. यामध्ये तिच्या बाळालाही जीव गमवावा लागला. या धक्कादायक घटनेने मोबाईल चार्जिंगला लावताना वा हाताळताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जेनिफर कॅरॉलाईन असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ती बाथरुममधून अंघोळ करुन बाहेर आली होती, आणि ओल्या हातांनीच आपला फोन चार्जिंगला लावत होती. एक्स्टेंशन कॉर्डने फोन चार्जिंगला लावताना, अचानक त्यात करंट आला आणि जेनिफरला वीजेचा धक्का बसला. या घटनेनंतर महिलेचा पती धावून आला. जोपर्यंत नवरा धावत आत गेला तोपर्यंत ती जमिनीवर पडली होती. पतीने तात्काळ मोबाइल इमरजेंसी केयर सर्व्हिस (एसएएमयू) ची टीम त्याच्या घरी पोहोचली मात्र उपचाराआधीच त्यांनी तिला मृत घोषित केले.
संबंधित महिला ९ वर्षाची गर्भवती होती, मात्र या दुर्घटनेत तिच्या बाळाचाही मृत्यू झाला. स्मार्टफोनच्या स्फोटामुळे मोठ्या दुर्घटना झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. ब्राजीलच्या कँपीना ग्रँडेमध्ये ही अशीच एक धक्कादायक घटना घडली. जेनिफर कॅरोलायने नावाच्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. छोट्याशा चुकीमुळे झालेल्या या दुर्घटनेत महिलेसह तिच्या बाळालाही जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशी घ्या काळजी
ओल्या हातांनी मोबाईल चार्जिंगला लावणे टाळा. रात्री मोबाईल चार्जिंगला लावून झोपू नका, किंवा मोबाईल रात्रभर चार्ज करणे टाळा. मोबाईल चार्ज करताना ओरिजनल केबलचाच वापर करा. मोबाईल १०० टक्के चार्ज करणे टाळा. तसेच २० टक्क्यांपेक्षा कमी असल्यावरच चार्जिंगला लावा.
Technology Pregnant Women Dies Mobile Charging
Electric Shock Charging Smartphone Safety