पुणे – काही वर्षांपूर्वीपर्यंत लॅपटॉप खूपच कमी प्रमाणात उपलब्ध होते. त्या काळात कार्यालयात जाऊन कॉम्प्युटर डेस्कटॉपवर काम करावे लागत होते. परंतु आजकाल डेस्कटॉपऐवजी लॅपटॉपला प्राधान्य दिले जात आहे. कोरोना महामारीच्या काळात लॅपटॉपचा खूपच फायदा झाला आहे. कोरोना काळात अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम काम करत आहेत. त्यामुळे अनेकांना लॅपटॉप संदर्भातील समस्यांचा सामना करावा लागला. कधी लॅपटॉप हँग तर, कधी स्क्रीन ब्लॅक होत आहे. ही फारच सामान्य समस्या असली तरी त्यामुळे कामांवर परिणाम होत आहे. या समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
लॅपटॉप नेहमीच हँग होण्याच्या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी सर्वात प्रथम किबोर्डवरील Ctrl + Alt + Delete बटन एकत्रित क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विंडोज टास्क मॅनेजर विंडो पॉप अप दिसेल. त्यामध्ये लॅपटॉपचा कोणता प्रोग्राम सर्वात अधिक CPU आणि RAM कन्झ्युम करत आहे हे तुम्हाला दिसेल. यापैकी कोणताच प्रोग्राम तुमच्या कामाचा नसेल. तो सर्वात जागा कन्झ्युम करत असेल तर तो त्वरित बंद करणेच योग्य ठरेल. त्यानंतर तुमचा लॅपटॉप चांगला सुरू होईल.
प्रोग्राम बंद केल्यानंतरसुद्धा लॅपटॉप हँग होण्याची समस्या दुरुस्त झाली नसेल तर लॅपटॉप पुन्हा एकदा रिस्टार्ट करा. रिस्टार्ट करण्यासाठी लॅपटॉपचे पॉवर बटनाला काही वेळ दाबून ठेवा. त्यानंतर तुमचा लॅपटॉप पूर्वीसारखा काम करेल अशी आशा आहे. पण त्यानंतरही लॅपटॉपची समस्या सुटली नाही, तर तो सर्व्हिस सेंटरलाच घेऊन जाणे योग्य ठरेल.
अनेक वेळा लॅपटॉपची स्क्रीन ब्लॅक होण्याची समस्या पाहायला मिळते. हीसुद्धा एक सामान्य समस्या आहे. ती दुरुस्त करण्यासाठी लॅपटॉप रिसेट करणे योग्य ठरेल. परंतु रिसेट करण्यापूर्वी लॅपटॉपमधील डाटाचा बॅकअप घेऊन तो दुसर्या कॉम्प्युटर किंवा हार्डडिस्कमध्ये सेव्ह करावा. त्याने तुमच्या समस्याचे उत्तरही मिळेल आणि डाटा डिलीटही होणार नाही.