पुणे – मोबाईल किंवा संगणक केवळ संपर्क साधने राहिली नसून त्यामधील गूगल आणि जीमेल या बिचारे वेगळ्या प्रकारे संदेश यंत्रणा उपलब्ध आहे. सहाजिकच ग्राहकांच्या सोयीसाठी जीमेलमध्ये नवनवीन फीचर आले असून आता यूजर्स चॅटसह ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत.
गुगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, गुगल चॅट आता जीमेलमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचा पर्याय देणार आहे. कंपनीने हे अपडेट केवळ अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी आणले आहे. परंतु चॅटमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. याच्या मदतीने आता फक्त चॅट लिस्टमध्ये उपलब्ध असलेल्यांशी वैयक्तिक ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता.
इतकेच नाही तर त्यात चॅट हिस्ट्री आणि कॉल डिटेल्सही पाहता येतील. गुगल चॅटच्या लिस्टमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला कॉल करायचा आहे त्याचे चॅट तुम्ही ओपन कराल, त्यानंतर तुम्हाला सर्वात वरती उजवीकडे ऑडिओ आणि व्हिडिओ आयकॉन दिसेल. कॉल करण्यासाठी तुम्हाला या आयकॉनवर टॅप करावे लागेल. ज्यावर तुमच्या व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलवर टॅप करून कॉल करू शकता. जीमेल तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या बाजुला (शीर्षस्थानी ) असलेल्या निळ्या बॅनरद्वारे चालू असलेल्या कॉलबद्दल सूचित करेल. त्यामध्ये व्यक्तीचे नाव आणि कॉलचा कालावधी असेल.
त्याचप्रमाणे मिस्ड कॉल इंडिकेशन संबंधित लाल रंगाचा फोन किंवा व्हिडिओ आयकॉन दिसेल. नवीन कॉलिंग अनुभव वैयक्तिक गुगल खाती असलेल्या सर्व वापरकर्त्यांसाठी तसेच गुगल वर्कस्पेस, बेसिक आणि व्यवसायिक ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहे. कॉल करण्यासाठी, कॉलर आणि कॉल स्वीकारणारे दोघेही जीमेलची नवीन आवृत्ती वापरत असणे आवश्यक आहे.
जीमेलवर कॉलिंग अपडेट अशा वेळी येते जेव्हा कंपनी Hangouts वरून गुगल चॅटवर शिफ्ट होत आहे. ही हालचाल सुरुवातीला गुगल वर्कस्पेससाठी होती, परंतु ती हळूहळू नियमित वापरकर्त्यांकडे येत आहे तसेच Hangouts सेवा देखील बंद होणार आहे. यासोबतच आता तुम्ही जीमेल, गुगल चॅटवर कस्टम स्टेटस सेट करू शकता.