सॅन फ्रान्सिस्को – गुगल कंपनीचे व्हिडिओ स्ट्रिमिंगचे व्यासपीठ समजल्या जाणार्या यू ट्यूब टीव्हीतर्फे एक अॅड ऑन फिचर सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये युजर्स ४K गुणवत्तेचा व्हिडिओ पाहू शकणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. Youtube TV सेवेद्वारे अमर्यादित स्ट्रीमिंग करण्याचा आनंद युजर्स घेऊ शकणार आहे. त्यासाठी Google Live टीव्हीचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे.
किती रुपयांत सेवा
Youtube च्या 4K Plus अॅड ऑन सर्व्हिससाठी युजर्सना प्रतिमहिना १९.९९ डॉलर (१४०० रुपये) अदा करावे लागेल. Youtube तर्फे प्रमोशन ऑफर दिली जात आहे. त्याअंतर्गत एका वर्षासाठी ९.९९ डॉलरमध्ये (७०० रुपये) सब्सक्रिप्शन दिले जात आहे. तसेच एका महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जात आहे. Google तर्फे प्रथमच Youtube व्ह्यूव्हर्सना ४K कंटेट उपलब्ध करू दिला जात आहे.
ऑफलाइन मोडमध्येही दिसणार
त्याव्यतिरिक्त आधीच डाउनलोड केलेले व्हिडिओ युजर्सना आपल्या फोन किंवा टॅबवर ऑफलाइन पाहण्याची परवानगी अॅड ऑन फिचर देत आहे. Youtube च्या या फिचरने युजर्सना घरी वाय-फाय नेटवर्कवर अमर्यादित स्ट्रिमिंगची सुविधा दिली आहे. स्टँडर्ड Youtube टीव्ही सब्सक्रिप्शनला एकत्रितरित्या तीन डिव्हाइसवर चालवू शकता येणार आहे.
Youtube TV मध्ये या सुविधा
4K Plus च्या घोषणेसह Youtube तर्फे अनेक नव्या सुविधा आणि बदल झाल्याचे पहायला मिळाले आहे. यामध्ये अनेक सेगमेंटला ज्वाइन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. स्पोर्ट प्रोग्राम आणि कंटेट सर्चचा पर्याय दिला आहे. Youtube ने सर्व टीव्ही युजर्ससाठी Dolby ५.१ ऑडिओ कॅपेबिलिटीला जोडण्यात आले आहे. या फिचर्सना निवडक डिव्हाइसवर आगामी आठवड्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे.