पुणे – व्हॉट्सअॅपकडून युजर्सना अनेक दिवसांपासून स्टेटस फिचरची सुविधा दिली जात आहे. या सुविधेअंतर्गत युजर्स कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा टेक्स्ट मेसेज २४ तासांसाठी अपलोड करू शकतात. २४ तासांनंतर स्टेटस दिसत नाहीत. त्यामुळे हे फिचर खूपच लोकप्रिय आहे. आपण नेहमीच आपल्या यादीतील नातेवाईक आणि मित्रांचे स्टेटस पाहत असतो. स्टेटस पाहणार्यांचे नाव सीन लिस्टमध्ये दिसून येते. परंतु तुम्हाला व्हॉट्सअॅपची ही ट्रिक माहिती आहे का, ज्याने तुम्ही लपून दुसर्यांचे स्टेटस पाहू शकता?
आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याने व्हॉट्सअॅप स्टेटस पाहिले तरीही तुमचे नाव सीन लिस्टमध्ये दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्यात एका सेटिंगचा वापर करावा लागणार आहे. चला तर मग ती ट्रिक जाणून घेऊयात.
यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या Read receipt सेटिंगला बदलावे लागणार आहे. त्यासाठी तुमचे व्हॉट्सअॅप उघडा आणि सेटिंगमध्ये जा. आधी Account आणि नंतर Privacy पर्यायात जा. तिथे तुम्हाला Read receipt चे फिचर दिसेल. हे फिचर ऑन असेल तर ते ऑफ किंवा डिसेबल करा. आता तुम्ही ज्या कोणाचे स्टेटस पाहताल, त्यांना तुम्ही स्टेटस पाहिले किंवा नाही, याबाबत काहीच कळू शकणार नाही. परंतु असे केल्याने तुमचे स्टेटस कोणी कोणी पाहिले याबाबतही तुम्हाला कळू शकणार नाही. त्यामुळे दुसर्यांचे स्टेटस पाहिल्यानंतर पुन्हा सेटिंग पूर्ववत करण्यास विसरू नका.