पुणे – प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म समजल्या जाणार्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपकडून ग्राहकांसाठी विविध सुविधा दिल्या जात आहेत. विविध फिचर्स किंवा अपडेट देऊन जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हॉट्सअॅपनेसुद्धा वेगवेगळे फिचर्स कार्यान्वित केले आहेत. व्हॉट्सअॅपतर्फे आता कथितरित्या ‘माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट’ हे प्रायव्हसी फिचर कार्यान्वित करण्याची तयारी सुरू केली आहे. या फिचरद्वारे व्हॉट्सअॅपवर आपली माहिती कोण पाहू शकेल हे युजर्सना नियंत्रित करता येणार आहे.
एका वृत्तानुसार, व्हॉट्सअॅप स्पेसिफिट अँड्रॉइड बिटा टेस्टर्ससाठी कॉन्टॅक्ट इन्फो आणि ग्रुप इन्फोसाठी आता नवा इंटरफेस जारी करणार आहे. हा इंटरफेस पूर्वी बिझनेस इन्फो पाहताना उपलब्ध होत होता. त्याशिवाय अँड्रॉइड बिटा युजर्सना अपडेटेड डिसअॅपिअरिंग मेसेज फिचरही मिळणार आहे. हे फिचर युजर्सना गायब होणार्या चॅटसाठी डिफॉल्ट मेसेज टायमरच्या रूपाने २४ तास, सात दिवस आणि ९० दिवसांचा अल्पकालिक वेळ निवडण्याची परवानगी देणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपने मल्टिडिव्हाइस फिचरमध्ये सुधारणा केल्या आहेत.
‘माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट’ मिळणार
व्हॉट्सअॅप फिचर ट्रॅकर WABetalnfo च्या माहितीनुसार, अँड्रॉइड २.२१.२३.१४ अपडेटसाठी व्हॉट्सअॅप बिटासोबत ‘माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट’ पर्याय सादर करण्यात येणार आहे. युजर्सचे लास्ट सीन, प्रोफाइल फोटो आणि अबाउट डिटेल यासारखी माहिती कोण कोण पाहू शकणार आहेत हे निवडण्याची परवानगी संबंधित फिचर देणार आहे.
लास्ट सीन सेटिंग्ज मेन्यूमध्ये एव्हरी वन, माय कॉन्टॅक्ट्स आणि नोबडी यासह आता चौथा पर्याय उपलब्ध असेल. ज्या युजर्सना ‘माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्ट’ द्वारे तुमची माहिती शेअर करावी वाटत नाही अशा युजर्सची निवड करावी लागेल. ज्या कॉन्टॅक्ट्सची निवड करण्यात आलेली नाही ते सगळे नोटिफिकेशन पाहण्यास सक्षम असतील. तसेच कोण्या युजर्सने स्पेसिफिट कॉन्टॅक्टसाठी आपल्या लास्ट सीन ला डिसेबल केले असेल, तर ते सुद्धा आपले लास्ट सीन पाहू शकणार नाही. लास्ट सीनसाठी हा नियम अबाउट आणि प्रोफाइल फोटोवर लागू होणार नाही.
नवे अपडेट आणणार नवे इंटरफेस
WABetalnfo च्या माहितीनुसार, अँड्रॉइड २.२.२१.२३.१३ अपडेटसाठी व्हॉट्सअॅप बिटा टेस्टर्ससाठी अनेक फिचर्स कार्यान्वित करणार आहे. पहिला कॉन्टॅक्ट इन्फोसाठी एक नवा इंटरफेस रिलिज होणार आहे. तो अँड्रॉइड २.२१.२३.१२ साठी व्हॉट्सअॅप बिटासोबत जारी करण्यात आला होता. व्हॉट्सअॅप लेटेस्ट अपडेटमध्ये अधिक बिटा टेस्टरसाठी नवा यूआय जारी करणार आहे. युजर्स ग्रुप इन्फोसाठी नवे इंटरफेस पाहणे सुरू करू शकतात.
डिसअॅपिअरिंग मेसेज
त्याशिवाय डिसअॅपअरिंग मेसेज फिचर युजर्सना २४ तास, सात तास आणि ९० दिवसांच्या अल्पकालिक काळ निवड करण्याची परवानगी देते. हा बदल पूर्वी आयओएस बिटा टेस्टरसाठी उपलब्ध होता. आता अँड्रॉइड टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी मेटाचा हक्क असणार्या या अॅपद्वारे सादर करण्यात आलेल्या या फिचरने सात दिवसांनंतर कोणत्याही विशेष मेसेजला आपोआप गायब करण्याचा पर्याय सादर करण्यात आला होता.