अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जर तुम्हाला तुमच्या घरी स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा आयफोन चालवताना नेटवर्क आणि इंटरनेटच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर याची अनेक कारणे असू शकतात. कदाचित तांत्रिक कारणांमुळे तुमचे नेटवर्क त्या भागात खंडित झाले असेल किंवा घरात ठेवलेल्या काही वस्तू जसे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरणे तुमच्या डिव्हाइसचे नेटवर्क ब्लॉक करत असतील. यासोबतच तुमच्या स्मार्टफोन किंवा डिव्हाइसमध्ये इंटरनेट काम न करण्याचे कारण तुमच्या नेटवर्कची सेटिंग्ज देखील असू शकते.
अजूनही अनेक कंपन्यांची कामे वर्क फ्रॉम होम स्वरुपात सुरु आहेत. त्यामुळे घरात चांगल्या स्पीडचे इंटरनेट असणे गरजेचे असते. पण काही वेळा इंटरनेट काम करत नही आणि आपली काम थांबतात. अशावेळी काय केले पाहिजे, तर सर्वप्रथम, तुमचा स्मार्टफोन किंवा डिव्हाइसमध्येच काही तांत्रिक अडचणी आहेत का तपासून पहा. जर घरातल्या प्रत्येक उपकरणाला ही समस्या असेल, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण जसे की राउटर किंवा नवीन इंटरनेट ऑपरेटिंग उपकरण बंद करुन पुन्हा सुरु करुन बघावे. उपकरण रिस्टार्ट केल्यामुळे ते पुन्हा जास्त क्षमतेने काम करायला सुरुवात करेल. फोनला नेटवर्क मिळत नसेल तेव्हादेखील तुम्ही ही पद्धत वापरु शकता. तसेच फोनच्या सेटिंग्ज तपासून त्या दुरुस्त करुन बघा.
फोन सेटिंग्ज बदला..
जर नेटवर्क काम करत नसेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाव. येथे तुम्ही तुमची नेटवर्क सेटिंग्ज रिसेट करू शकता. रिसेट करण्यासाठी, मोबाइल नेटवर्कवर टॅब करा आणि नंतर मॅन्युअल आणि ऑटो नेटवर्क निवडा. दुसरीकडे, जर तुम्ही iOS वापरकर्ते असाल तर तुम्हाला मोबाइल आणि सिम सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला नेटवर्कवर क्लिक करून नेटवर्क शोधावे लागेल, त्यानंतर तुम्ही तुमचे नेटवर्क निवडू शकता.
तरी इंटरनेट कार्य करत नसल्यास..
जर तुमचे नेटवर्क अजूनही काम करत नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल डेटा चालू आणि बंद करू शकता. किंवा तुम्ही तुमचा फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवू शकता तसेच फोन रिबूटही करू शकता. या पद्धतींनी इंटरनेट निश्चितच काम करेल.