मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
गेल्या पाच-सात वर्षांत भारतातील टीव्ही मार्केट खूप बदलले आहे. आता भारतातील स्मार्ट टीव्हीची अवस्था स्मार्टफोनसारखी झाली आहे. आज तुम्हाला 20 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही मिळेल. काही वर्षांपूर्वी बिगर स्मार्ट एलईडी टीव्हीचे युग होते आणि आता स्मार्ट टीव्हीचे युग सुरू आहे.
स्मार्ट टीव्हीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळे तुम्ही फोनमध्ये चालणारी जवळपास सर्व अॅप्स टीव्हीवर चालवू शकता, अगदी स्मार्ट टीव्हीवर फेसबुक वापरू शकता. आता तुमच्याकडे जुना नॉन स्मार्ट टीव्ही असेल आणि आता तुमच्या टीव्हीवर Amazon Prime आणि Netflix पाहायचे असतील तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करा आणि दुसरा मार्ग म्हणजे त्यात नवीन तंत्रज्ञान टाकू शकता.
एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्स
जुन्या टीव्हीमध्ये USB किंवा HDMI पोर्ट असल्यास स्मार्ट टीव्ही बनू शकतो. त्यामुळे टीव्हीमध्ये हे पोर्ट्स असतील तर तुम्ही एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्सद्वारे तुमचा टीव्ही स्मार्ट टीव्ही बनवू शकता. या बॉक्समध्ये तुम्हाला Android 9.0 Pie, Google Play-Store, Google Assistant आणि Voice Control ची सुविधा मिळेल. याशिवाय, हा सेट-टॉप बॉक्स तुमच्या जुन्या टीव्हीशी HDMI केबलद्वारे कनेक्ट करू शकता आणि त्यानंतर इंटरनेटद्वारे टीव्ही चालवू शकता आणि हवे असलेले अॅप्स पाहू शकता.
डिश स्मार्ट हब Android HD सेट
टाटा स्काय आणि व्हिडिओकॉन सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी डिश टीव्हीने स्मार्ट हब अँड्रॉइड एचडी सेट-टॉप बॉक्स लॉन्च केला. या सेट-टॉप बॉक्समध्ये Google Play Store, Google Assistant आणि अंगभूत Chromecast सपोर्ट आहे. याशिवाय, डिश टीव्ही स्मार्ट किट डोंगल खरेदी करून आणि तुमच्या जुन्या टीव्हीला जोडलेल्या या बॉक्सशी कनेक्ट करून Amazon Prime आणि Netflix सारख्या ऑनलाइन स्ट्रीमिंग अॅप्सवरून व्हिडिओ पाहू शकता.
अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक
तुमचा जुना टीव्ही स्मार्ट बनवायचा असेल तर तुम्ही Amazon Fire Stick वापरू शकता. या डिव्हाइसमध्ये अॅलेक्सा व्हॉईस रिमोट कंट्रोलसह Amazon Prime आणि Netflix सारख्या प्रिमियम अॅप्सचा प्रवेश मिळेल. त्याच वेळी, तुम्ही या टीव्ही स्टिकला HDMI पोर्टद्वारे टीव्हीशी कनेक्ट करू शकता. टाटा स्काय बिंज प्लस टाटा स्कायने इतर डीटीएच कंपन्यांना टक्कर देण्यासाठी टाटा स्काय बिंज प्लस सेट-टॉप बॉक्स सादर केला. या डिव्हाइसमध्ये Google Chromecast सह Google Assistant चा सपोर्ट मिळेल. त्याच वेळी, हा सेट-टॉप बॉक्स 4K, HD, LED, LCD आणि Plasm तंत्रज्ञानासह टीव्हीला समर्थन देतो. तसेच जुन्या टीव्हीला ऑडिओ आणि व्हिडीओ केबलद्वारे कनेक्ट करता येईल. realme 4K स्मार्ट Google TV स्टिकची किंमत 3,999 रुपये आहे. यासोबत गुगल टीव्हीसाठी सपोर्ट आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा कोणताही जुना टीव्ही स्मार्ट टीव्ही म्हणून वापरू शकता. यासोबत ड्युअल कोर GPU 2 GB रॅम आणि 8 GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. यासोबत HDR10 प्लस साठी सपोर्ट देखील आहे.