इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘मायक्रोसॉफ्ट एज’ या मायक्रोसॉफ्टच्या ब्राउझरनी बऱ्याच चांगल्या सुविधा दिल्या असल्या तरी अजूनही बरेच लोक गुगलचा क्रोम ब्राउझर वापरतात. खरे म्हणजे मायक्रोसॉफ्ट एज हासुद्धा क्रोमच्या क्रोमियम प्रणालीवरच आधारलेला आहे. तरीही अजून एजला म्हणावी तितकी लोकप्रियता मिळालेली नाही. परंतु एकदा तो वापरायला लागला तर त्याची गोडी वाढेल.
म्हणूनच स्पर्धेत सतत टिकून राहण्यासाठी क्रोम सतत अपडेट होत असतो. आज आलेल्या ताज्या अपडेटमध्ये (Version 98.0.4758.82 (Official Build) (64-bit)) काही चांगल्या सोयी करण्यात आल्या आहेत. तुम्ही एखादे पेज ब्राउज करत असताना ते पेज पटकन कोणाला पाठवायचे असेल तर पाठवू शकता. शेअरिंगचे बटण अगदी वरच्या भागात ऍड्रेस बारमध्येच दिले आहे. तिथे तुम्हाला कॉपी लिंक, कास्ट, सेव्ह पेज असे पर्याय दिसतील. याच बरोबर व्हाट्सअप, फेसबुक, LinkedIN अथवा ट्विटर यावर पेजची लिंक थेट शेअर करण्याची सोय दिली आहे. त्यासाठी तुम्ही शेअर आयकॉनवर क्लिक करा. नंतर दिलेल्या ऑप्शनमधून तुम्हाला हवे असलेले ऑप्शन निवडा आणि ते पेज सहज शेअर करा.
घरी अथवा कार्यालयात एक कॉम्प्युटर एकापेक्षा अधिक लोक वापरत असले तर वापरणारा प्रत्येक माणूस क्रोमवर स्वतःचे स्वतंत्र प्रोफाईल करू शकतो. किंबहुना त्याने तसे करावे. त्यासाठी ब्राऊजरच्या अगदी वरती उजवीकडे प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. नंतर प्लिज ऍडवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तुमचे प्रोफाइल ऍड करता येईल. तुम्ही जेव्हा लॉगिन करून कम्प्युटर वापराल तेव्हा तुम्ही बिनधास्त काम करू शकता. तुम्ही काय काम केले आहे हे दुसऱ्या प्रोफाइलमधून दुसऱ्या व्यक्तीला चेक करता येणार नाही आणि तुमचे काम पूर्णपणे सुरक्षित राहील.
आणखी एक महत्त्वाची सोय म्हणजे आपण काम करता करता अनेक Tab ओपन करतो. ते क्लोज करायची वेळ आली तर चुकून हवा असलेला Tab क्लोज होण्याची शक्यता असते. पण असाच हवा असलेला Tab बंद झाला तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही ताबडतोब Tab stripवरच मोकळ्या जागेत राइट क्लिक करून ‘रिओपन क्लोज Tab ‘ वर क्लिक करू शकता. तुमचा क्लोज झालेला Tab परत ओपन होईल. यासाठी तुम्ही कंट्रोल शिफ्ट टी असा कीबोर्ड शोर्टकट पण वापरू शकता.
तुम्हाला एका विषयाचे सगळे Tab एकत्र यावेत असे वाटत असेल तर त्यांचा ग्रुप पण तयार करू शकता. एखाद्या Tabवर राईट क्लिक करा. नंतर ग्रुपवर क्लिक करा आणि आधी तयार केलेला एखादा ग्रुप अथवा नवीन ग्रुप करायचा असेल तर त्यावर क्लिक करा. Tabचे ग्रुप तयार होतील. ते वापरायला अतिशय सोपे जातील.