मुंबई – फेसबुक हे सोशल माध्यम सध्या खुपच लोकप्रिय आहे. आपण सध्या कुठे आहोत, काय करत आहोत इथपासून सर्व प्रकारची माहिती अनेक जण फेसबुकवर शेअर करीत असतात. मात्र, फेसबुकचा वापर करण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे. तेच आपण आज जाणून घेणार आहोत….
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर आपण आपले विचार, फोटो, व्हिडीओ यांसारख्या अनेक गोष्टी शेअर करतो. चॅटिंगदरम्यान काहीवेळी वैयक्तिक माहितीही शेअर केली जाते. ज्यांनी प्रायव्हसी सेटिंग व्यवस्थित सेट केली असेल तर त्यांना काळजी करण्याचं कारण नाही. आपल्या नकळत फेसबुकवर आपल्याबाबत कोण कोण वाचत आहे हेदेखील समजत नाही. त्यामुळे अनेक वेळा युझरचं फेसबुक अकाऊंट हॅक होण्याची शक्यता जास्त बळावते. तर कधी कॉम्प्युटवर लॉग आऊट करण्याचं विसरलो तर तुमची माहिती हॅक करुन त्याचा वापर चुकीच्या कामासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे फेसबुकवर युझर्सना काही गोष्टी शेअर करताना काळजी घ्यायला हवी.
जन्मतारीख
अनेक जण त्यांच्या जन्मतारखेचा फेसबुकवर जरुर उल्लेख करतात. पण असं करताना युझर हॅकर्सना त्यांची वैयक्तिक माहिती देत असतात. कारण तुमच्या मित्रांना तुमचा वाढदिवस माहितच असतो. त्यामुळे युझर्सनी जन्मतारेखचा उल्लेख टाळायला हवा. पण तरीही तुम्हाला जन्मतारखेचा उल्लेख करायचा असल्यास जन्मसालाचा उल्लेख करुच नयेच.
स्टेटस
तुमच्या रिलेशनशिपची माहिती सार्वजनिक करणं टाळावं. जेव्हा तुम्ही तुमचं स्टेटस कमिटेडपासून सिंगल करता त्यावेळी ज्यांना तुमच्याशी मैत्री करणाऱ्यांना, तुम्हाला त्रास देण्याची आयतीच संधी मिळते. अशावेळी तुमच्या प्रोफाईलमध्ये रिलेशनशिप स्टेटस ब्लँक ठेवलेलाच बरा.
लोकेशन
आपण कुठे आहोत, हे सांगण्यासाठी काही लोकांना फेसबुकवर लोकेशन टॅग करणं आवडतं, पण ही गोष्ट तुम्हाला संकटात टाकू शकते. फेसबुकवर तुम्ही सगळ्यांना खुलेआम सांगत असता की, तुम्ही घरी नाही तर बाहेर आहात. यामुळे चोरांना चोरीची संधी मिळते. त्यामुळे सुट्टीवरुन परतल्यानंतर फोटो अपलोड करुन तुम्ही किती धमाल केली सांगा.
लहान मुले
जर तुमच्या घरात लहान मुलं एकटे असाल तर स्वत:च्या आणि मुलांबाबत फेसबुक अकांऊटवर काहीही लिहू नका. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवं.
टॅग करु नये
आपण अनेकदा मुलांचे फोटो अपलोड करतो, पण नकळत त्यांना त्यांच्याच नावाने टॅग करतो. इतकंच नाही तर आपण त्या फोटोंमध्ये मित्रांना, भाऊ-बहिणींना, दूरच्या नातेवाईकांनाही टॅग करतो. पण या माहितीचा वापर करुन चोरटे मुलांना फसवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांचे नापाक मनसुबे पूर्ण करतात. त्यामुळे ते फोटो मुलांच्या पालकांना ई-मेल करा.