नागपूर – अनेकांना आपल्या मोबाईलमध्ये डोकावण्याची सवल असते. फोन अनलॉक झाल्यावर आपल्याला न विचारता ते अॅक्सेस करू लागतात. अनेक वेळा तर असे लोक आपल्या फोनमधील खासगी माहितीसुद्धा पाहणे कमी करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच, मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरल्यानंतर आपल्या मोबाईल फोनमधील सर्व माहिती चोरट्यांच्या हाती लागू शकते. पण, आज आपण एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला अशा फिचरबद्दल सांगणार आहोत, जे इनेबल केल्यानंतर मोबाईल अनलॉक असताना दुसरी व्यक्ती फोन अॅक्सेस करू शकणार नाही. या फिचरबद्दल खूपच कमी लोकांना ठाऊक असेल. हे फिचर ऑन केल्यानंतर तुमचा फोन सुरक्षित राहणार आहे. हे फिचर कसे इनेबल करावे हे जाणून घेऊयात
हे करुन पहा
१) हे फिचर इनेबल करण्यासाठी सर्वात प्रथम सेटिंग्जमध्ये जा
२) सेटिंग्जमध्ये Security and lock screen चा पर्याय दिसेल
३) त्या पर्यायावर क्लिक करावे
४) आता फोनवर प्रायव्हसीसंदर्भात अनेक पर्याय दिसतील
५) थोडे खाली आल्यानंतर तुम्हाला Pin the screen किंवा screen pinning चा पर्याय दिसेल
६) स्क्रिनवर पिनिंगच्या पर्यायाला सिलेक्ट करा
७) सिलेक्ट केल्यानंतर स्क्रीन पिनिंग फोनमध्ये ओपन करा
८) त्यानतंर तुम्हाला ज्या अॅपला ओपन करायचे आहे ते ओपन करून बंद करा
९) आता तुम्ही रिसेट अॅपमध्ये जा
१०) त्यावर गेल्यानंतर संबंधित अॅपला दीर्घकाळ प्रेस करून पिनचा पर्याय निवडायचा आहे
११) ही प्रक्रिया केल्यानंतर अनलॉकच्या स्थितीत ज्या अॅपला पिन केले आहे तेच अॅप चालेल.
१२) म्हणजेच विना पिन तुमच्या मोबाईलचे अॅप कुणीही वापरु शकणार नाही
स्क्रीन पिनिंगला कसे करावे डिसेबल?
स्क्रीन पिनिंगला डिसेबल करण्यासाठी होम आणि बॅकचे बटन एकत्र दाबायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला लॉक स्क्रीनचा पासवर्ड नोंदवावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर पिन केलेले अॅप डिसेबल होईल.