इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टेक्नो मोबाईल या प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने त्याच्या पीओव्हीए मालिकेतील पीओव्हीए ४ लाँच करण्याची घोषणा केली आहे. मल्टीटास्कर्स आणि गेमर्स या फोनकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करू शकतात, कारण पीओव्हीए ४ मध्ये ६ एनएम हेलिओ जी ९९ प्रोसेसर, हायपर-इंजिन २.० लाइट आणि पँथर इंजिन समाविष्ट आहे तसेच इन-बिल्ट ड्युअल गेमिंग इंजिन याचे खास वैशिष्ट्य आहे. टेक्नो पीओव्हीए ४ ची किंमत ११,९९९ रुपये आहे. याचा पहिला सेल १३ डिसेंबर २०२२ रोजी ॲमेझॉन आणि जिओ मार्टवर सुरू होईल.
हा फोन अश्या गेन्झ ग्राहकांसाठी डिझाइन केला आहे जे त्यांच्या स्मार्टफोनवर असंख्य ऍप्लिकेशन्स वापरतात, मोठ्या प्रमाणात डेटा वापरतात आणि नेहमी मजबूत कार्यप्रदर्शन आणि चांगली मेमरी देणार्या स्मार्टफोनच्या शोधात असतात. पीओव्हीए ४ मध्ये मेमरी फ्यूजन तंत्रज्ञानासह उत्कृष्ट १३ जीबी, रॅम १२८ जीबी स्टोरेज आणि ९० एचझेड रिफ्रेशिंग रेटसह ६.८-इंचाच्या १८ डब्ल्यु फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी विशाल ६००० एमएएच बॅटरी आणि ९० एचझेड रिफ्रेशिंग डिस्प्लेस आहे. हा स्मार्टफोन क्रायोलाइट ब्लू, युरनोलिथ ग्रे आणि मॅग्मा ऑरेंज या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
पीओव्हीए सिरीजच्या नवीन फोनबद्दल भाष्य करताना, टेक्नो मोबाईल इंडियाचे सीईओ अरिजीत तलपात्रा म्हणाले, “जसे ग्राहक विकसित आणि अधिक जाणकार होत आहेत, तसतसे स्मार्टफोनकडून त्यांच्या अपेक्षाही वेगाने विकसित होत आहेत आणि यामध्ये अनेक प्रकारांचा समावेश आहे- कामापासून, शिक्षणापासून ते अगदी मनोरंजनापर्यंत. लोक एकमेकांशी कनेक्टेड राहण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवतात ज्याने, गेमिंग समुदाय केवळ वाढत आहे आणि वाजवी दरात उच्च-कार्यक्षमता असणाऱ्या गेमिंग स्मार्टफोनची मागणी देखील वाढत आहे. पीओव्हीए सिरीजसह आम्ही ग्राहकांना पॉवरहाऊस फोन प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे जी वेग, कार्यप्रदर्शन आणि उत्कृष्टतेचा दर्जा कायम ठेवेल.
Techno POVA 4 Magma Smartphone Features Price
Mobile