इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या १५ खेळाडूची घोषणा आज बीसीसीआयने केली आहे. सूर्यकमुमार यादवच्या नेतृत्वात हे खेळाडून ही स्पर्धा खेळणार आहे. तर शुभमन गिल उपकर्णधार असेल. सूर्यकुमार यादव व अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
टीम इंडियामध्ये सूर्य कुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार) असणार असून अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंग यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
या संघात श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांना टीममध्ये घेण्यात आले नाही. निवडण्यात आलेल्या टीममध्ये सूर्यकुमार यादव कप्तानी करेल. तर तिलक वर्मा, अभिषेख शर्मा हे टॅाप ऑर्डरमध्ये खेळतील. अभिषेक शर्मा ओपनिंग करेल. तर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव हे तिस-या किंवा चौथ्या नंबरवर बॅटिंग करेल. शुभमन गिल हे कोणत्या नंबरवर खेळतील हे अद्याप स्पष्ट नाही. संजू सॅमसन, जितेश शर्मा यांची विकेटकीपर व फलंदाजीसाठी निवड करण्यात आली आहे. बॅालर म्हणून जसप्रती बुमराह, अर्शदीप सिंह हर्षित राणा हे असणार आहे. तर ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल यांचाही समावेश करण्यात आला आहे.