इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकीकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये आघाडी घेतलेली असताना दुसरीकडे महिला संघानेही हम भी किसीसे कम नहीं म्हणत महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला नमवित सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने आतार्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या भारताने सात गडी राखून गाठली. सुरुवातीला १५० धावांचे हे लक्ष्य अशक्य वाटत होते. मात्र भारताच्या जेमिमाह रॉड्रिग्जने (५३, नाबाद) आक्रकपणे फलंदाजी केल्यामुळे भारताला हे लक्ष्य गाठणे शक्य झाले. या विजयासाठी भारताने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वीपणे पाठलाग केला आहे.
https://twitter.com/BCCIWomen/status/1624808434041491456?s=20&t=YGzMi-_Bv2z-AOLdRWy0WA
सचिन तेंडुलकर, विराट कोहलीने केले अभिनंदन
पाकिस्तानला पराभूत केल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच भारतीय क्रिकेपटून विराट कोहलीने अभिनंद केले आहे. सचिन तेंडुलकरने हा सामना पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत पाहिल्याचे सांगितले. तसेच जेमिमाह, ऋचाचेही सचिन तेंडुलकरने कौतुक केले.
सात गडी राखून विजय
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. जेमिमाहला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
https://twitter.com/BCCIWomen/status/1624819174840336385?s=20&t=YGzMi-_Bv2z-AOLdRWy0WA
Team India Win Against Pakistan Records