इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीम इंडियाने आज मकर संक्रांतीची देशवासियांना प्रचंड मोठी भेट दिली आहे. टीम इंडिाने अतिशय रेकॉर्ड ब्रेक आणि महाविराट असा विजय आज संपादन केला. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला. वनडे इतिहासातील हा धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. 2008 मध्ये त्यांनी आयर्लंडचा 290 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, भारतीय संघाचा यापूर्वीचा विक्रम 257 धावांनी विजयाचा होता, जो त्यांनी 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध मिळवला होता. शानदार शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले. या मालिकेत त्याने तीन सामन्यांत दोन शतकांच्या मदतीने 283 धावा केल्या. यासाठी त्याची प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही निवड करण्यात आली.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 5 गडी गमावून 390 धावा केल्या. शुभमन गिलने 116 आणि विराट कोहलीने 166 धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने 22 षटकांत नऊ गडी गमावून 73 धावा केल्या. अशेन बंडारा दुखापतीमुळे मैदानावर येऊ शकला नाही. अशा प्रकारे टीम इंडियाने 317 धावांनी विजय मिळवला.
https://twitter.com/BCCI/status/1614637485572907013?s=20&t=_1m1VT84qw5rGor4Mvf0DQ
भारताने चौथ्यांदा श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला
भारतानेही श्रीलंकेचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. भारताने पहिला एकदिवसीय सामना 67 धावांनी आणि दुसरा एकदिवसीय सामना चार विकेटने जिंकला. टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला आहे. यापूर्वी 1982/83 मध्ये भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाने 2014/15 मध्ये श्रीलंकेच्या भारत दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका 5-0 ने जिंकली होती. त्याचवेळी, 2017 मध्येही भारताने पाच सामन्यांची वनडे मालिका 5-0 अशी जिंकली होती.
https://twitter.com/BCCI/status/1614630165711327233?s=20&t=_1m1VT84qw5rGor4Mvf0DQ
शुभमन-रोहितने शानदार सुरुवात करून दिली
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 92 चेंडूत 95 धावांची भागीदारी केली. रोहितचे अर्धशतक हुकले. तो 49 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत कर्णधाराने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. यानंतर शुभमनने कोहलीच्या साथीने भारताला मजबूत स्थितीत नेले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 110 चेंडूत 131 धावांची भागीदारी केली.
https://twitter.com/BCCI/status/1614628711810371584?s=20&t=_1m1VT84qw5rGor4Mvf0DQ
Team India Mega Record 317 Runs Defeat Sri Lanka