इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं नेहमीच विशेष असतं. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया शिक्षकांकडून रचला जात असतो. हे कर्तव्य प्रामाणिकपणे, निरपेक्ष भावनेने जो शिक्षक करतो तो नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण करतो. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या विद्यार्थी – शिक्षकाच्या व्हिडीओमध्ये हेच चित्र दिसून येत आहे. शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थी रडत असून, शिक्षक त्यांना समजावत असल्याचं दिसतंय. या व्हीडिओमुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाविषयी प्रेम दिसून येत असल्याने सोशल मीडियावर या शिक्षकाचं कौतुक केलं जात आहे.
आयएएस अधिकारी अवनिश शर्मा यांनी हा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. १ मिनिटे ५५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेले निर्मळ नाते दिसत आहे. शाळेतून मुख्य रस्त्यापर्यंत सोडायला येणारे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि ज्या शिक्षकाची बदली झाली त्याची भावनिकता यातून दिसून येते. शिक्षकही त्या मुलांना चांगलं राहा, खूप मोठं व्हा, शिका असं सांगत असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. या व्हिडीओवर अनेक जणांनी कमेंट करून संबंधित शिक्षकाचे अभिनंदन केले आहे.
एक स्कूल शिक्षक के स्थानांतरण के बाद विदाई. pic.twitter.com/1PQg0b1mCL
— Awanish Sharan ?? (@AwanishSharan) July 15, 2022
तुमच्यासाठी परत येईन..
हमसून हमसून रडणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षक परत येण्याचं आश्वासन देताना दिसत आहे. मात्र विद्यार्थी इतके भावनिक झाले आहेत की त्या शिक्षकाचे ऐकून घेण्याचीही मानसिकता त्यामुळे नसल्याचे दिसते. आपल्या शिक्षकांनी आपल्याच शाळेत राहिलं पाहिजे हा त्यांचा हट्ट दिसून येत आहे.
कमेंट्समधून शिक्षकाविषयी आदर
या व्हीडिओवर अनेकजणांनी कमेंट केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे प्रेम, विश्वास मिळवलेला शिक्षक हल्लीच्या काळात अपवादानेच दिसतो. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात असेच स्थान निर्माण केले पाहिजे, अशा कमेंट्स या व्हीडिओवर बघायला मिळत आहेत.
Teacher Transfer Students Crying Emotional Video Viral