नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिक्षण संस्था(NESTS) ही आदिवासी मंत्रालयांतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था असून शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांची 4062 पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. नेस्ट्स ने अलीकडेच 4062 पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षा(ESSE)-2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे ‘ईएमआरएस’ मध्ये दर्जेदार मनुष्यबळ नियुक्त करून ‘ईएमआरएस’ च्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा होईल.
यासाठी 30-6-2023 पासून आवेदनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीबीएसईच्या समन्वयाने नेस्ट्स ESSE-2023 या परीक्षेचे ओएमआर आधारित(पेन-पेपर) प्रकाराने खालील शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आयोजन करत आहे.
पदाचे नाव…संख्या…
प्राचार्य… 303
पीजीटी… 2266
लेखापाल… 361
कनिष्ठ सहायक सचिव (JSA)… 759
लॅब अटेंडंट… 373
एकूण… 4062
प्रत्येक पदासाठी ऑनलाईन अर्जाची सविस्तर प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि अभ्यासक्रमासह इतर सर्व तपशील emrs.tribal.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील ‘ईएमआरएस’ मधील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी हे पोर्टल 30.06.2023 ते 31.07.2023 या दरम्यान खुले आहे.
50% किंवा त्यापेक्षा जास्त किंवा 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी असलेल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समुदायाच्या लोकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी मंत्रालयाचा ईएमआरएस हा एक अग्रणी उपक्रम आहे.