पाटणा (बिहार) – बेगुसराय जिल्ह्यातील चांदपुरा येथील एका खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकाने वसतिगृहात १० वर्षीय विद्यार्थ्याशी लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागी गरम लोखंडाने (इस्त्रीने) चटके दिले. यामुळे तो गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी दोघा शिक्षकांना करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू आहे. राज्य सरकारने शाळा-महाविद्यालय व वसतिगृहे बंद करण्याचा आदेश आहेत. तरीही शाळेच्या संचालकाने कोविड मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केले. याचा फायदा घेत शिक्षकाने विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, शालेय शिक्षक राहुल कुमार आणि चंदन कुमार यांना पोलिसांनी अटक करून तुरूंगात पाठविले आहे.
याप्रकरणी पोलिसांना सांगितले की, दोन शिक्षकाने वसतिगृहातील लोखंडी इस्त्री गरम करून त्याला डाग दिले. तसेच हा प्रकार सांगितला तर आम्ही तुझे नाव शाळेतून काढून टाकू, अशी धमकीही दिली. पोलिस मुख्यालयाचे अधिकारी अमित कुमार कांत यांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता आरोपींपैकी दोन शिक्षकांना पी सी स्कूलमधून अटक केली आहे.